Pune News : पुणे भाजप महिला मोर्चाच्या वतीने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे भारतीय जनता पार्टीच्या महिला शहराध्यक्ष अर्चना तुषार पाटील यांनी मकरसंक्रांत निमित्ताने महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम बुधवारी (दि.27) सायंकाळी पाचवाजता आयोजित करण्यात आला होता. यावेळी 300 हून अधिक महिला उपस्थित होत्या.
यावेळी उपमहापौर सरस्वती शेडगे, वरिष्ठ सल्लागार व संपर्कप्रमुख प्रतिभा मटाले, सरचिटणीस आशा बिववे, कांचन कुंबरे, रेखा चोंदे, गायत्री भागवत, उपाध्यक्ष माधुरी गिरमकर, किरण सुप्रिया खैरनार, संगिता राजगुरू, अश्विनी पवार, स्वाती मोरे, गौरी करंजकर, अनुराधा नखाते, वंदना कोद्रे, चिटणीस विनिता काळे, विजया भोसले, मालती अवघडे, संगीता गवळी, कल्पना पुरंदरे, सीमा जगताप, शमा जाधव, ईशानी, अमृता देवगावकर, रेशमा सय्यद, प्रभारी भावना शेळके, अनिता तलाठी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित महिलांचे आभार पुणे शहर महिला मोर्चाच्या प्रसिद्धप्रमुख सोनाली शितोळे भोसले यांनी मानले.