Pune News | जीवे मारण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याप्रकरणी हवेली पोलिसानी (Haveli Police) दोघांना अटक (Twro Arrest) केली. न्यायालयाने (Court) त्यांना दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मंगळवारी (ता. २९) दिला आहे.

अभिषेक गंगणे (वय १९) Abhishek Gangane आणि श्रेयश मते (वय १९) Shreyash Mate अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर इतर पाच जणांवर गुन्हा (FIR on Five) दाखल करण्यात आला आहे. याबाबत रुपेश पासलकर (वय २१) Rupesh Pasalkar यांनी फिर्याद दिली आहे. २७ जून रोजी रात्री साडेआठ वाजता हवेली तालुक्यातील (Haveli Taluka) नांदेड गावच्या (Nanded Gaon) हद्दीत ही घटना घडली.

पासलकर (Pasalkar) हे त्यांच्या मित्रासह गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपींनी त्या ठिकाणी येऊन त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गंगणे आणि मते यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्हा करण्यामागचा त्यांचा हेतू काय होता?, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी, त्यांचा आणखी कोणी साथीदार होता का? याचा तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकीलानी केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांना दोन जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Web Title :- pune news | haveli police arrest two in attempt to murder case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी

Ladakh Standoff | 70 वर्षात वर्षात पहिल्यांदा भारताने बदलली भूमिका, चीनसोबत सीमेवर पुन्हा तैनात केले 50,000 सैनिक