Pune News : अपहरणाच्या गुन्ह्यात ‘तो’ तब्बल 20 वर्षांपासून फरार, अखेर वानवडी पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – गेली 20 वर्ष पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत असलेल्या एकाला वानवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. अपहरणाच्या गुन्ह्यात तो तब्बल 20 वर्षांपासून फरार होता. मैनुद्दित साहब पटेल (रा. भिमनगर झोपडपट्टी कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शहरात फरार असलेल्या तसेच सराईत गुन्हेगारांची माहिती काढली जात आहे. यादरम्यान वानवडी पोलिसांना अपहरणाच्या गुन्ह्यातील २० वर्षांपासूनचा फरार आरोपी पेट्रोलपंपाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून मैनुद्दितला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे, सहाय्यक उपनिरीक्षक प्रदीप गुरव, भंडलकर, गिरमकर, गोसावी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.