Pune News | शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची नियमावली जारी; जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | कोरोनाची (Corona virus) परिस्थिती आटोक्यात आल्याने राज्यातील सर्व शाळा (School) येत्या 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला. या पार्श्वभुमीवर आता शाळा सुरु करण्याआधी कोरोना नियमावली जारी करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी आणि सुरू झाल्यावर कोणती काळजी घ्यावी याबाबतची सविस्तर नियमावली (Pune News) आरोग्य विभागाकडून (Department of Health) जारी करण्यात आली आहे.

 

आरोग्य विभागाच्या (Department of Health) शाळेबाबत असणा-या नियमावलीनूसार, ‘कोरोना विषयक नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी शाळा, विद्यार्थी, शिक्षक सर्वांनीच घ्यावी,’ अशा स्पष्ट सूचना आरोग्यसेवा संचालक डॉ. अर्चना पाटील (Dr. Archana Patil) यांनी दिल्या आहेत. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती निंयत्रणात येत आल्याने राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. परंतु सरकारने शाळा सुरु करण्यासाठी काही नियमने आखुन दिली आहेत. काळजी आणि कोणती खबरदारी घ्यावयाची आहे हे सविस्तर सांगितले आहे. (Pune News)

 

काय आहे नवी नियमावली?

 

 • कन्टेन्मेंट झोनमधील शाळा सुरू करू नयेत.
 • कन्टेन्मेंट झोनमधील विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत येण्यास अनुमती देऊ नये.
 • शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळेची स्वच्छता करून घ्यावी.
 • शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती पध्दत टाळावी.
 • शिक्षक व विद्यार्थी संख्या विचारात घेऊन शाळेत मुबलक ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करावी.
 • शक्यतो शाळेत गर्दी होणारे खेळ सामूहिक प्रार्थना असे उपक्रम टाळावेत.
 • शाळेतील जलतरण तलाव सुरू करू नयेत. सर्वांनी फेसमास्क, फेस कव्हर, हॅन्ड सॅनिटायझर यांचा पुरेसा साठा ठेवावा.
 • कोरोना विषयक लक्षणे असणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास परवानगी देऊ नये.
 • शाळेत दर्शनी भागात कोरोना प्रतिबंधक संदर्भातील आरोग्य शिक्षण विषयक साहित्य लावावे.
 • स्कूल बस मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहनात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • आजारी विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेत येऊ नये.
 • विद्यार्थी व शिक्षकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी.
 • त्याचप्रमाणे शाळेत कोणालाही कोरोना विषयक लक्षणे आढळल्यास कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबतची सविस्तर नियमावली आरोग्य विभागाकडून सांगितलं आहे.

 

Web Title : Pune News | Health department regulations starting schools pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात रस्त्यावरील गुंडागर्दीत तुफान वाढ ! रिक्षाचालक, कामगार, ज्येष्ठ महिला, तरुणांना भर रस्त्यात गाठून लुबाडण्याच्या घटना

Immunity | Omicron व्हेरिएंटच्या धोक्यापूर्वी मजबूत करा इम्यूनिटी, ‘या’ 8 गोष्टींचा आहारात करा समावेश; जाणून घ्या

Punit Balan Group | लोकसंगीत आणि ‘तबला-खंजिरी-कथ्थक’च्या जुगलबंदी ने गाजवला ‘तालचक्र’ महोत्सवाचा पहिला दिवस