Pune News | विसर्जन हौदाची पाहणी करताना आरोग्य कर्मचाऱ्याला वीजेचा धक्का, दोन्ही पाय जळाले; हॅपी कॉलनीतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुण्यात गणेशोत्सव उत्साहात (Ganeshotsav 2023) सुरु असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत (Warje Karve Nagar Regional Office) विसर्जन हौदाची पाहणी करताना एका आरोग्य कर्मचाऱ्याला वीजेचा जोरादर धक्का (Electric Shock) बसला आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी (Health Worker) गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार हॅपी कॉलनीत घडला असून या घटनेत कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय जळाले आहे. (Pune News)

पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानाशेजारी (Pandit Jitendra Abhishekhi Park) गणपती विसर्जन हौदावर कम करत असताना सूरज रमेश खुडे हा कंत्राटी कामगार हातातील वायर फेकत होता. त्यावेळी हाय टेन्शन तारेला या वायरचा स्पर्श झाला. त्या विजेचा स्फोट होऊन खुडे गंभीर जखमी झाला. त्यांना प्रथम एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Pune News)

दरम्यान, कामावर असताना एखाद्या कंत्राटी कामगाराचा अपघात झाला तर संबंधित कंत्राटदार जबाबदारी घेत नाहीत.
पुणे मनपा कामगार युनियनच्या (Pune PMC Workers Union) वतीने कंत्राटी कामगारांना इएसआयसीचे ओळखपत्र त्वरित देण्याची मागणी वारंवार करुन देखील संपूर्ण कंत्राटी कामगारांना ते दिलेले नाही.
अपघात झालेल्या कंत्राटी कामगारांना महापालिकेने मोफत उपाचार करण्याची जबाबदारी घ्यावी,
असे निवेदन पालिका आयुक्तांना लेखी दिले आहे. तरी संबंधित मागणीला पालिका प्रशासनाने अद्याप मान्यता
दिलेली नाही, असे कामगार युनियनचे चिटणीस वैजीनाथ गायकवाड यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणी काळभोर : पत्नीनं अंगावर पेट्रोल ओतून घेतलं, पतीनं चक्क तिला पेटवलं