Pune News : आरोग्य कर्मचाऱ्यांना 6 महिन्या करिता एकवट मानधनावर रुजु करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्भुमीवर आपण खालील सर्व कर्मचाऱ्यांना ४५ दिवसाकरीता एकवट मानधन तत्वावर कामावर रुजु करण्यात आले होते. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, निवासी आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, सहायक दवाखाना, हिवताप निरीक्षक, आया, औषध निर्माता, परिचारक, परीचालिका, कक्ष सेवक म्हणून एकवट, खाते नगरसचिव कार्यालय मानधन तत्वावर काम करणारे सर्व कोविड योद्धा म्हणून पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभागाच्या कोविड सेंटर, स्वाब सेटर, दवाखाना येथे सेवा करीत होते.

कोरोना सारख्या महामारी च्या काळात मध्ये या सर्व कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे कार्य करत होते. तसेच कोरोनाचा प्रादर्भाव जरी कमी झाला असला तरी कोरोना पुर्णपणे गेला नाही आहे. तसेच नविन कोरोना ही उद्धभवला आहे व अश्या परिस्थितीत व भविष्यात या सर्व कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. पुढील काही दिवसांत शासनाच्या वतीने कोविड १९ वँक्सीनची लसीकरण सुरु होणार आहे व या उपक्रमांसाठी या सर्वांची गरज भासणार आहे. तरी सर्व वरील कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांकरीता एकवट मानधन तत्वावर कामावर रुजु करण्यात येण्याचा निर्णय स्थायी समिती द्वारे घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी च्या गटनेता दिपाली ढुमाळ यांनी या विषयी पत्र दिले होते.