Pune News | मुसळधार पावसाचा मंगळवार पेठेतील काही भागाला फटका; सभागृह नेते गणेश बिडकर, मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडून पाहणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | शहरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मंगळवार पेठेतील काही भागाला बसला. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठले होते. महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी मंगळवारी सकाळी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सभागृह नेते गणेश बिडकर (ganesh bidkar)) यांच्यासह सहाय्यक क्षेत्रीय आयुक्त आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित (Pune News) होते.

शहरातील (Pune News) अनेक भागांमध्ये सोमवारी संध्याकाळनंतर सलग दोन ते अडीच तास झालेल्या पावसामुळे ६९ मंगळवार पेठेतील रस्त्यावर पाणी साचले होते. तर या परिसरातील काही कुटुंबांचे या पावसामुळे नुकसान देखील झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी या भगाला भेट देत आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या ठिकाणी असलेल्या नाल्यावर कायमस्वरूपी काम करून घ्यावे जेणेकरून अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, असेही पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बजाविले. आशिष महादळकर, अविनाश संकपाळ, संतोष तांदळे यांच्यासह इतर अधिकारी आणि स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

 

Web Title : Pune News | Heavy rains hit parts of Pethe on Tuesday; PMC House Leader Ganesh Bidkar, Municipal Commissioner Vikram Kumar inspected

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrapur Crime | खळबळजनक ! मुख्याध्यापकाकडून 7 अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शाळेच्या पहिल्या दिवशी घडलेली घटना

Postal Life Insurance | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये दरमहिना जमा करा केवळ ‘एवढया’ रूपयांचा प्रीमियम; 30 वर्षानंतर मिळतील 13 लाख रुपये