Pune News | शेतकऱ्यांमधील नकारात्मकतेचे विष काढून टाकण्यास मदत करा ! जागतिक अध्यात्मिक आणि मानवतावादी नेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे आवाहन

नैसर्गिक शेतीचे यश साजरे करण्यासाठी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रभावाबद्दल गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दहा हजार शेतकरी एकत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | एक जरी शेतकरी दुःखी किंवा तणावग्रस्त दिसला, तर थांबा आणि त्याच्याशी बोला. त्याला काय त्रास होतोय ते विचारा. त्याच्या मनातून नकारात्मकतेचे विष काढून टाकण्यास मदत करा. महाराष्ट्र सरकारनेही भविष्यात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत याबद्दल काळजी घ्यावी. यासाठी आमचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक तुमच्यासोबत काम करतील, अशी ग्वाही जागतिक अध्यात्मिक आणि मानवतावादी नेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी दिली. (Pune News)

दहा हजार शेतकरी, ५०० सरपंच आणि गावांचे प्रमुख यांचा ऐतिहासिक  ग्रामोत्सव महाराष्ट्र या  मेळाव्यात ते बोलत होते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या  त्रिवेणी आश्रम, मरकळ (आळंदी) येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी हिवरे बाजारचे सरपंच व पद्मश्री पुरस्कारप्राप्त पोपटराव पवार, अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.(Pune News)

आर्ट ऑफ लिव्हिंग सामाजिक प्रकल्प आणि महाराष्ट्र सरकार-मनरेगा यांनी जलतारा प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी सामंजस्य करार केला.  यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे ओएसडी  मंगेश चिवटे, महाराष्ट्र मनरेगा विभागाचे ओएसडी  राहुल गेठे, तसेच रोहयो – मनरेगा विभागाच्या उप सचिव संजना घोपडे उपस्थित होत्या.

नैसर्गिक शेती, जलयुक्त शिवार, ग्रामविकासातून राष्ट्रविकास अशा अनेक विषयांवर गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आपल्याला शेतकरी आत्महत्या ताबडतोब थांबवायला हव्यात. जर शेतकरी दु:खी असतील तर ग्राहक ही निरोगी राहू शकत नाही.

गुरुदेवांनी गावातील प्रमुखांना आणि पालकांना युवक आणि मुले व्यसन आणि दारूपासून दूर राहतील याची काळजी घेण्याचे आवाहन केले.  “संत तुकाराम आणि संत नामदेव यांच्या काळात जशी भक्ती आणि आनंदाची लहर होती, तशी आता वाढवायला हवी.” असेही ते म्हणाले.

गुरुदेवांबद्दल शेतकऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त

आर्ट ऑफ लिव्हिंगने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामामुळे आपल्या जीवनात बदल घडला आणि समृद्धी आली याबद्दल हजारो शेतकऱ्यांनी गुरुदेवाबद्दल  कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्रातील  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे १०,००० हून अधिक आदिवासी शेतकऱ्यांना नैसर्गिक आणि शाश्वत शेतीचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले आहे.  विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ही या प्रकल्पाचा उल्लेख केला गेला होता.

केवळ झाडेच सेलिब्रिटी : सयाजी शिंदे

सयाजी शिंदे यांनी सांगितले,  “आज गुरुदेवांच्या उपस्थितीत मी अनुभवले की जेव्हा आपण सकारात्मक विचारसरणीने काम करतो तेव्हा काम कसे यशस्वीपणे होते.” त्यांनी प्रत्येकाला किमान ५०० झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केले. “केवळ झाडे सेलिब्रिटी दर्जाला पात्र आहेत.” असेही ते म्हणाले.

नैसर्गिक शेती करा : पवार

पोपटराव पवार  म्हणाले, “केवळ रसायनमुक्त शेतीमुळेच आपल्या भावी पिढ्या निरोगी राहतील.  त्रेतायुगात आपल्याला मिळालेले रामराज्य हवे असेल तर आपल्याला गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेची अंमलबजावणी करावी लागेल आणि सर्वत्र नैसर्गिक शेती करावी लागेल.”

राज्यात सर्वांगीण ग्रामीण विकास घडवून आणण्याच्या आपल्या प्रयत्नाचा भाग म्हणून, आर्ट ऑफ लिव्हिंगने महाराष्ट्र सरकारसोबत नुकत्याच स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांतर्गत, महाराष्ट्रात १३ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात नैसर्गिक शेतीचा अवलंब करीत असून त्याकरिता हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. आणि ते एवढ्यावरच थांबणार नाहीत, तर ते त्यांच्या उत्पादनासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून  देत आहेत, ज्यामुळे मध्यस्थ दलालांना वगळले जाईल आणि परिणामी शेतकऱ्यांच्या नफ्यामध्ये वाढ होईल.


आजच्या कार्यक्रमात  किसान बास्केट लॉन्च करण्यात आली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना बास्केटची निर्मिती करण्यासाठी सदस्यत्व घेऊन थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधता येईल.

नैसर्गिक शेतीचे अनेकविध फायदे आहेत. महाराष्ट्रातले शेतकरी किशोर थोरात सांगतात, “गुरुदेवांच्या प्रेरणेने,
मी गेली सात वर्षे नैसर्गिक शेती करत आहे. मिश्र पिके घेऊन,  नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळे आणि भाज्यांचे दर आता
मी ठरवतो. एक एकर जमिनीत मी २८ प्रकारची फळे आणि ४० प्रकारच्या भाज्या पिकवतो.
मला वर्षाला सुमारे ७ लाख रुपये नफा मिळतो.”  नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण घेतलेले आणखी एक शेतकरी, फलटण
जवळील धुमाळवाडी गावातील दत्तात्रय डुमर, पिकवलेली फळे संपूर्ण भारत, दुबई आणि यूकेमध्ये विकत आहेत. 
तसेच ते सर्व सेंद्रिय उत्पादन असल्याने रासायनिक खतांवर पैसा वाया जात नाही.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जलतारा प्रकल्पांतर्गत ४५,५०० जलतारा रिचार्ज स्ट्रक्चर्स ११५ गावांमध्ये केवळ २ वर्षात बांधून
लाखो लोकांना फायदा झाला आहे.  जलतारा रिचार्ज स्ट्रक्चर्स रेती, बारीक गिट्टी आणि खडकांनी भरलेल्या ४x ४x६
आकाराच्या रिचार्ज स्ट्रक्चर्स आहेत, ज्यामुळे पाणी वाहते, झिरपते आणि भूजलाचे पुनर्भरण होते, ज्यामुळे पूर रोखला जातो,
धूप कमी होते आणि जमिनीचे पोषण राखत  शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण होते. पाण्याच्या पातळीत सरासरी १४ फुटांनी
सुधारणा झाली आहे;  शेतकऱ्यांचे उत्पन्न सरासरी १२०% पेक्षा जास्त वाढले आहे आणि पीक उत्पादनात ४२% पेक्षा
जास्त सुधारणा झाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Conduct Elections On Ballot | EVM विरोध आता गावपातळीवर! सांगलीतील ‘या’ गामपंचायतीचा ठराव, ‘निवडणुका बॅलेटपेपरवर घ्या’

Maharashtra Politics Opinion Poll 2024 | आगामी निवडणुकीत ‘महायुती’ची वाट कठीण, महाराष्ट्रात काय असेल स्थिती, सीव्होटर सर्व्हेतील अंदाज जाणून घ्या…

Pune BJP | विविध क्षेत्रातील सुमारे 200 महिलांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश

Maharashtra Budget Session | राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीला; अर्थमंत्री अजित पवार 28 ला सादर करणार अर्थसंकल्प

खुन करुन फारार झालेल्या तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक