Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

पुणे (Pune News) : पुणे सातारा रोडवरील (Pune Satara Road) सिटी प्राईड (City Pride) जवळ असलेल्या हॉटेल शीतल रेस्टॉरंट अँड बारला (Hotel Shital Restaurant & Bar) आज सकाळी आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नसून अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु आहे.

सिटी प्राईड मल्टीफ्लेक्सच्या (City Pride Multiflex) पुढे सर्वात जुने असे शीतल हॉटेलला (Hotel Shital) आज सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. याची खबर अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire brigade) दोन गाड्या, एक वॉटर टँकर घटनास्थळी तातडीने रवाना झाले.

त्याचबरोबर देवदूतच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी पाण्याचा मारा करुन आग नियंत्रणात आणली आहे. या आगीमध्ये हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून आग विझविण्याचे काम अजूनही सुरु आहे.

हे देखील वाचा

पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु; चार दहशतवादी निशाण्यावर

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू

Pune Crime News | …नाहीतर गोळ्या घालीन ! 2 कोटींच्या खंडणी, फसवणूक प्रकरणी उद्योजक नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड आणि दीपक गवारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Hotel fire in Pune Bibwewadi Firefighters begin extinguishing the blaze

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update