Pune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार घरांसाठी 57 हजार आले अर्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे म्हाडाच्या (Pune MHADA) वतीने सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल 2 हजार 908 घरांची सोडत काढली होती. कोरोना संकट (Corona crisis ) असतानाही म्हाडाच्या घरांना प्रचंड प्रतिसाद (response) मिळाला असून, 3 हजार घरांसाठी 57 हजार लोकांनी अर्ज केला आहे. आता या घरांची सोडत जून अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पुणे Pune News म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील (Pune MHADA Chief Officer Nitin Mane-Patil) यांनी दिली.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Sambhajiraje Meets Uadayanraje | ‘दम असेल तर अधिवेशन बोलवावं, आधी राज्याने धाडस करावं, केंद्राचं मी बघतो’; उदयनराजे संतापले (व्हिडीओ)

पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापुर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 2908 घरांची सोडत काढली होती. कोरोनाचे सावट असतानाही 6 महिन्यांत दोन वेळा तब्बल 2 हजार पेक्षा अधिक घरांची सोडत काढण्याचा नवा विक्रम पुणे म्हाडाने केला आहे.

Young writer and researcher Shashank Kulkarni | शशांक कुलकर्णी यांना कृषी धोरणांवरील संशोधनासाठी आंतराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

यात सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यातील म्हाडाच्या 2 हजार 153 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील प्राप्त झालेल्या 755 सदनिका अशा एकूण 2 हजार 908 सदनिकेच्या अंतिम नोंदणीसाठी 13 मेपर्यंत मुदत होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन् नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव सदर जाहिरातील योजनेत अर्ज करण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार अर्ज करण्यासाठी 13 जूनपर्यंत मुदत दिली होती, ती काल संपली आहे.

Web Title : Pune News huge response citizens mhadas new record many 57000 citizens applied 3000 houses pune division

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | ‘मी तुला खूप लाईक करतो’ ! मुलीचा विनयभंग, आरोपीला न्यायालयाने सुनावली 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक

काय सांगता ! होय, 74 % भारतीय कर्मचार्‍यांना आवडला ’वर्क फ्रॉम होम’ पर्याय