Pune News : दारू पिण्यास पैसे न दिल्यानं पतीनं पत्नीला चोपलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला लाटण्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चतु:शृंगी परिसरात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी नामदेव तुकाराम विटकर (वय 43) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाव आहे. याबाबत माला विटकर (वय 40) यांनी चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी वडारवाडीत राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. नामदेव याला दारूचे व्यसन आहे. गेल्या आठवड्यात (दि. 10 फेब्रुवारी) नामदेव याने पत्नी माला हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु माला यांनी पैसे नाहीत, असे सांगत पैसे देण्यास नकार दिला. याचा राग नामदेव याला आला होता. त्यावरून वाद झाला आणि वादाचे रुपांतर भांडणात झाले. नामदेव याने शिवीगाळ करत पत्नी माला यांना हाताने बेदम मारहाण केली. तो मारहाण करत असताना माला यांनी हात धरला असता त्याने घरातील लाकडी लाटणे घेऊन उजव्या हातावर जोरात मारले. यात त्या जखमी झाल्या आहेत. अधिक तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.