Pune News | ‘मी तुला खूप लाईक करतो’ ! मुलीचा विनयभंग, आरोपीला न्यायालयाने सुनावली 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune molestation | ‘मी तुझा मित्र असून मी तुला खूप लाईक करतो. मी माझा मोबाईल नंबर देतो त्याच्यावर व्हॉटस्अपला (WhatsApp)  हाय म्हणून मेसेज पाठव.
आपण उद्या भेटू’ असे म्हणून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत विनयभंग (molestation) करणा-या
तरुणाला न्यायालया(court) ने सहा महिने सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार (judge k. K. Jahagirdar) यांनी हा आदेश दिला.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

अमोल घाटे (वय १९) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्यांचा कारावास  भोगावा लागेल,
असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नोव्हेंबर व ऑक्टोंबर २०१८ रोजी हडपसर (Hadapsar) परिसरात हा प्रकार घडला होता.
त्याप्रकरणी १४ वर्षीय मुलीने हडपसर पोलीस (Hadapsar Police) ठाण्यात फिर्याद दिली होती.
अमोल याने अल्पवयीन पिडीतेचा पाठलाग करून मी तुझा मित्र असून मी तुला खूप लाईक करतो.

मी माझा मोबाईल नंबर देतो त्याच्यावर व्हॉटस्अपला हाय म्हणून मेसेज पाठव,
उद्या भेटू असे म्हणून पाठलाग करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपीला अटक करत त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले.
यामध्ये त्यांनी सहा साक्षीदार तपासले.
खटल्यात संबंधित मुलगी व तिच्या मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची ठरली.
गुन्ह्याचा तपास हडपसर येथील पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक
एस. एस. गावडे (Sub-Inspector of Police S. S. Gawde) यांनी केला.
न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी आर. एन. कांबळे (R. N. Blankets) यांनी त्यांना मदत केली.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Pune News | ‘I like you so much’! molestation case Accuse sentenced to 6 months hard labor

हे देखील वाचा

Sambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, राजे म्हणाले – ‘संभाजी राजेंच्या आंदोलनाला माझा पाठिंबा’ (Video)

Pune News | काँग्रेसच्या छत्री मोफत दुरुस्ती उपक्रमास प्रारंभ; उपक्रम सामाजिक जाणीव व्यक्त करणारा – किरण मोघे

दुर्देवी ! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, कुटुंबीय करणार ‘हे’ मोठं काम