Pune News | ‘त्यांच्या घरात पाणी देण्याचा माझा जो मानस आहे तो निश्चित पूर्ण करेल’ – अमोल बालवडकर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune News | आज सकाळी मी (अमोल बालवडकर – amol balwadkar) माझे सहकारी नारायणराव चांदेरे (Narayanrao Chandere), अनिल बापू ससार (Anil Bapu Sasar) नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुस मध्ये गेलो असता अनेक महिला भगिनींनी पिण्याच्या पाण्याची मागणी केली. पिण्याचे पाणी घेण्यासाठी अनेक नागरिक बाणेर पर्यंतचा दोन- तीन किलोमीटरचा प्रवास करतात, यातील काही पायपीट करत तर काही लोक मोटारसायकलवर 20 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी घेऊन पिण्याचे पाणी भरण्यासाठी येतात.

 

दररोजची ही त्यांची पायपीट आणि मोटारसायकलवर पाणी वाहण्याची शृंखला सुरू असल्याचे समजले. हे अतिशय धोकादायक आणि जीवावर बेतणारे काम पाहून खूप वाईट वाटले. तेथील माता-भगिनींना पाण्यासाठी रोज तरसावे लागत होते.

 

त्याच क्षणी माझ्या मनात एक विश्वास निर्माण झाला व मी त्यांना शब्द दिला की येणाऱ्या 24 तासाच्या आत तुमच्या घरापासून अगदी नजीकच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देतो. लगेचच यंत्रणा कामाला लावून आणि अवघ्या 10-12 तासात तेथे प्रत्येकी 2 हजार लिटर क्षमतेच्या 10 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या. त्यात पाणी आणून जलपूजन केले व तात्काळ आजच्या आज ते लोकांना वापरासाठी उपलब्ध करून दिले. यावेळी सुसच्या उपसरपंच दिशाताई ससार, (Dishatai Sasar) नारायणराव चांदेरे (Narayanrao Chandere), अनिल बापू ससार (Anil Bapu Sasar), शशिकांत बालवडकर (Shashikant Balwadkar), स्थानिक नागरिक, महिला भगिनी व अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सभासद उपस्थित होते. (Pune News)

यामध्ये माझा कोणताही चमकोगिरी करण्याचा उद्देश नाही. जनतेचं लवकरात लवकर व तात्काळ काम होणं हे माझं कर्तव्य आहे.
त्या कर्तव्यप्रती सदरील काम तात्काळ पूर्ण केले आणि नागरिकांची या समस्येतून सुटका केली.
आज संध्याकाळी जेव्हा या भागात पाणी आलं त्यावेळेस इथल्या नागरिकांच्या व महिला भगिनींच्या चेहऱ्यावरील
समाधान आणि आनंद बघून मला अतिशय समाधानी वाटले.

 

विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून मी सुस-म्हाळुंगे परिसराला रोज 20 टँकर मोफत पाणी पुरवठा करीत आहे.
इथून पुढील काळात ते 50 टँकरपर्यंत कसे जाईल हा माझा मानस आहे.
आज या भागात मी 10 टाक्या लावल्या, गरज पडल्यास केवळ 10 टाक्याच नाही तर अजून 20, 30, 50 जरी टाक्यांची आवश्यकता भासली तरी चालेल,
मी माझ्या स्वखर्चाने येथे त्या उपलब्ध करून देईल. पण माझ्या माता भगिनींना कुठेही पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही,
त्यांना त्यांच्या घराजवळच पाणी मिळेल याची योग्य ती काळजी मी घेईल.

 

येणाऱ्या काळात जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला तर त्यांच्या घरात पाणी देण्याचा माझा जो मानस आहे तो निश्चित पूर्ण करेल असेही अमोल बालवडकर म्हणाले. (Pune News)

 

Web Title :- Pune News | ‘I will definitely fulfill my intention to provide water to their house’ – Amol Balwadkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ICC Tournaments Schedule | भारत दोन वर्ल्ड अन् चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे करणार आयोजन, ICCची मोठी घोषणा

Vir Das | ‘भारतात दिवसा महिलांची पूजा, रात्री त्यांच्यावर बलात्कार’; कॉमेडियन वीर दासच्या कवितेवरून नवा वाद

Pune-Pimpri-Baramati Rickshaw Fare Hike | 22 नोव्हेंबरपासून रिक्षाची भाडेवाढ ! पहिल्या दीड कि.मी.साठी 21 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी.साठी 14 रुपये भाडेदर