Pune News | गरुड गणपती आणि गजानन मंडळ पालखीतून विसर्जन मिरवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने रविवारी निरोप देण्यात आला. शहरात रविवारी गणपतीमय वातावरण होते. सार्वजनिक मंडळांनी मंडपात हौद उभारून किंवा नजीकच्या महापालिकेच्या (Pune News) हौदात गणपतीचे विसर्जन केले.

लक्ष्मी रस्त्यावरील श्री गरुड गणपती मंडळ (Shri Garud Ganpati Mandal) आणि श्री गजानन मंडळ (Shri Gajanan Mandal) यांच्या गणपतींचे पालखीतून एकत्रितपणे मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. मंडपापासून मोदी गणपती (Modi Ganpati) जवळील वाहनतळ येथील हौदापर्यंत ही पालखी कार्यकर्त्यांनी खांद्यावरून वाहिली. पालखीतून निघालेल्या मिरवणुकीने लोकांचे लक्ष वेधले होते.मिरवणुकीत महिलांचा उत्साही सहभाग (Pune News) होता. श्री गरुडगणपती मंडळाचे अध्यक्ष सुनिल कुंजीर (Sunil Kunjir), कार्याध्यक्ष कैलास कांबळे (Kailas Kamble), श्री गजानन मंडळाचे अध्यक्ष राकेश गाडे (Rakesh Gade)आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते. शासकीय नियम पाळण्यासाठी मिरवणुकीत वाद्य पथके टाळली होती, उत्साही पण शिस्तबद्धरित्या गणरायाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

Web Titel :- Pune News | Immersion procession from Garud Ganpati and Gajanan Mandal Palkhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना कसे मिळाले सचिन वाझेकडून 4.7 कोटी?, न्यायालयात झाला खुलासा

Chinkara Deer Killed In Pune | वन राज्यमंत्री भरणेंच्या इंदापुर तालुक्यात गोळ्या झाडून चिंकारा हरणांची शिकार?, पुणे जिल्ह्यात खळबळ

Gold Price | सोनं मिळतंय 11000 रुपयांनी ‘स्वस्त’, पुन्हा कमाईची संधी; जाणून घ्या 2021 अखेरपर्यंत किती होणार दर