Pune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका – संजीवनी जाधव

पुणे : कोरोना महामारीमध्ये पोलीस, डॉक्टर्स, प्रशासकीय यंत्रणेबरोबर अत्यावश्यक सेवेमध्ये स्वयंसेवी संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच आपण आजचा ऐतिहासिक आणि मोलाचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत, असे मत स्वीकृत नगरसेविका संजीवनी जाधव यांनी व्यक्त केले.

विठ्ठलनगरमध्ये ज्येष्ठ स्वच्छता कर्मचारी शकुंतला बडलकर, दगाबाई वाल्हेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त अश्वमेध फाउंडेशन, पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्था यांचा संयुक्त विद्यमाने मुंढवा-हडपसरमधील (प्रभाग क्र.22) विठ्ठलनगर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी माजी उपसरपंच आशाताई बोडके, आरोग्य निरीक्षक जगदीश साळवे, बाळासाहेब गाढवे, श्रीनाथ भोसले, शशी पारवे, जेष्ठ नागरिक संघाचे अरविंद कान्हेरे, जयसिंग पासलकर, बापू कड, शैलेश होले, आदेश कान्हेरे, रामभाऊ कांगोकर, शारदा काळभोर, प्राची बनकर, सतीश साळसकर, प्रदीप काळे, मधुकर बनकर, गोविंद क्षीरसागर, सुरेश शिंदे, प्रवीण तांबे, जनार्दन जाधव आदी उपस्थित होते. यावेळी स्वच्छता दूतांचा सन्मान करण्यात आला.

विठ्ठलनगर परिसरातील स्वच्छता अभियानात गजानन कॉलोनी मित्र मंडळ, अजिंक्य कॉलनी मित्र मंडळ, बनकर कॉलनी मित्र मंडळ, क्रांती युवा प्रतिष्ठाण, श्री गुरुदेव दत्त सेवा प्रतिष्ठाण, अमरदिप प्रतिष्ठाण, नेताजी सुभाष मित्र मंडळ, श्री दत्त मित्र मंडळ परिसरात स्वच्छता करण्यात आली.

अश्वमेध फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम जाधव म्हणाले की, आपण आपले घर आणि घराचा स्वच्छ ठेवतो. आपल्या आरोग्यासाठी घराबरोबर शहराचेही आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाचा वाटा असणे महत्त्वाचे आहे. स्वच्छ आणि सुंदर शहर अशी आपल्या शहराची ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.