Pune News | पुण्यात तरूणीनं जवळीक साधत केला विश्वासघात ! दारू विक्रीचा बनावट परवाना देऊन 40 लाखांची फसवणूक

पुणे (Pune News) : दारु विक्रीचा बनावट परवाना देऊन एका तरुणीने मित्राच्या मदतीने तब्बल ४० लाख ४३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शुभम दुर्गेश गौर (वय ३३) आणि रुजना गौर (वय २६, रा. फुरसुंगी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत कोथरुडमधील हॅपी कॉलनीत राहणार्‍या ३३ वर्षाच्या तरुणाने शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ जानेवारी ते १९ सप्टेंबर २०२० दरम्यान शिवाजीनगर न्यायालय व इतरत्र झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुजना गौर हिने शुभम गौर हा दिल्लीतील एन सी टी येथे सहायक आयुक्त या सरकारी पदावर काम करत असल्याचे खोटे सांगितले. बनावट आयकार्ड दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यांनी प्रथम हडपसर येथे नवीन फ्लॅट घेतला. त्यासाठी आम्हाला पैशांची आवश्यकता आहे, असे सांगून शिवाजीनगर न्यायालयात समजूतीचा करारनामा करुन फिर्यादीशी जवळीक साधून विश्वास संपादन केला.

त्यानंतर फिर्यादीकडून वेळोवेळी रोखीने व ऑनलाईनद्वारे पैसे घेतले.
तसेच फिर्यादीच्या मित्रांकडून ४० लाख ४३ हजार रुपये घेतले.
त्या मोबदल्यात फिर्यादीला मेसर्स सयुरी वाईन्स अँड कंपनी नावाचे दारु विक्री परवाना देतो, असे सांगितले.

बनावट दारु विक्री परवान्याची कलर झेरॉक्स व वाईन बार लायसन्स कलर झेरॉक्स देऊन पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मुंढे अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

Lakshadweep BJP | भाजपला मोठं खिंडार, एकाचवेळी 15 भाजप नेत्यांचा पक्षाला रामराम

Gargle Effect On Corona : एका दिवसात किती वेळा गुळण्या कराव्यात, जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

 

मल्टीविटामिनने भरलेल्या शेवग्याच्या भाजीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे; Drumstick चे फुलं, पानं अन् साल देखील खुपच फायद्याची, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | In Pune a young woman betrayed by getting close Fraud of Rs 40 lakh by issuing fake liquor license

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update