Pune News | पुण्यात प्रियांक खर्गे यांच्याविरोधात आंदोलन, सावरकरांबद्दलच्या वक्तव्यानंतर भाजप युवा मोर्चा आक्रमक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | भाजप युवा मोर्चाने (Pune Bjp Youth Morcha) पुण्यातील सारसबाग जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) पुतळ्यासमोर प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष करण मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढण्यात यावे, असे विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Congress President Mallikarjun Kharge) यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांनी केले होते. त्याचे संतप्त पडसाद आज पुण्यात उमटले. (Pune News)

जोडे मारो आंदोलन केल्यानंतर करण मिसाळ यांनी म्हटले की, देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सावरकर यांचे योगदान मोठे आहे. पण काँग्रेस सावरकरांबद्दल चुकीची माहिती समाजासमोर आणण्याचे काम करत आहे. (Pune News)

कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काढण्यात यावे, हे प्रियांक खर्गे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. प्रियांक खर्गे यांनी माफी मागावी. अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल असा इशारा मिसाळ यांनी दिला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Winter Session 2023 | कांदा निर्यातबंदी, इथेनॉल निर्मितीवरील बंदीबाबत अजित पवार सभागृहात म्हणाले, ”गरज पडल्यास…”

Shweta Tiwari Hot Photo | श्वेता तिवारीच्या मादक अदेवर चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो..

किराणा माल विक्रेत्या व्यावसायिकाची 10 लाखांची फसवणूक, हडपसर परिसरातील प्रकार

Ajit Pawar | नवाब मलिकांसंदर्भातील फडणवीसांच्या पत्रावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ”त्या पत्राचे काय करायचे ते…”

Pune Crime News | जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक, येरवडा परिसरातील प्रकार