Pune News | विद्येच्या माहेरघरात GEM पोर्टलचे उद्घाटन ! महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. साडे सात लाख महिला जीईएम पोर्टलद्वारे Government E Marketing (GEM portal) जोडण्याचे महिला मोर्चाचे उद्दीष्ट आहे. संपूर्ण भारतातील महिलांना या पोर्टल चा फायदा होणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हे मोठे पाऊल आहे. या पोर्टलशी महिलांना जोडण्याची मोहीम पुणे (Pune News) म्हणजेच विद्येच्या माहेरघरातून होतोय याचा जास्त आनंद होतोय. असे मत भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन (Vanathi Srinivasan) यांनी व्यक्त केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन लघुउद्योजिका, बचतगट, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी केंद्रीय पातळीवर ई मार्केटिंग पोर्टल विकसित करण्यात आले आहे. सदर पोर्टलला जीईएम (Government E Marketing) असे नाव देण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपा महिला मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पोर्टलच्या राष्ट्रीय प्रभारी सुखप्रीत कौर, महाराष्ट्र गोवा प्रभारी उपाध्यक्षा ज्योतीबेन पंड्या (Jyotiben Pandya), सरचिटणीस दीप्ती रावत, उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे (BJP Mahila Morcha state president Uma Khapre), पुणे शहरअध्यक्ष जगदीश मुळीक (BJP Pune City President Jagdish Mulik), शहराध्यक्षा अर्चना पाटील (archana tushar patil), वर्षा डहाळे आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर महिला आघाडी व उषाताई वाजपेयी यांनी केले (Pune News) होते.

Web Title : Pune News | Inauguration of GEM Portal at Vidya’s Home! Launched by Vanathi Srinivasan, National President, Mahila Morcha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा;
आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या