Pune News | सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे कोंढव्यात मुख्य कार्यालय

पुणे मनपाच्या आगामी निवडणुकीत SDPI चे उमेदवार निवडणूक लढणार

 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – (बासित शेख) – Pune News | समानता आणि स्वातंत्र्याच्या अधीन राहून नव राष्ट्रनिर्माण करण्याचा अजेंडा समोर ठेवून काम करणार्‍या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयाचे कोंढव्यात (Social Democratic Party of India Kondhwa Branch) शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी पार्टीचे उपाध्यक्ष बी. एम. कांबळे (Party Vice President B. M. Kamble), राज्य उपाध्यक्ष सदाशिव त्रिपाठी (State Vice President Sadashiv Tripathi) प्रमुख पाहुणे म्हणून (Pune News) उपस्थित होते.

 

 

सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष बी. एम. कांबळे यांनी सांगितले की, समानता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या संविधानात दिलेल्या बाबींची बांधिलकी मानून राष्ट्र निर्माण करण्याचा उद्देश ठेवून सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया काम करीत आहे. (Pune News) पार्टीच्या नागपूर, मुंबई, पुण्यासह अनेक शहरात कार्यालये आहेत. सध्या संविधानाच्या (Constitution) विरोधात काम चालू आहे. संविधानाची पायपल्ली करण्याचे काम सुरु आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणून बेरोजगारी, नोकर्‍यांचा अभाव, आरक्षण (Reservation) संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे. धर्माच्या नावावर भांडणे लावण्याचा प्रकार सुरु आहे. त्याला विरोध करुन समानतेवर राष्ट्रनिर्माण करण्याचा पार्टीचा प्रयत्न आहे. भूक व भयापासून समाजाची सुटका करण्याचा पार्टीचा मुख्य कार्यक्रम असल्याचे बी.एम. कांबळे यांनी सांगितले.

 

राज्य उपाध्यक्ष सदाशिव त्रिपाठी यांनी सांगितले की, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ही भाजप (BJP) व कम्युनिस्ट पक्षाप्रमाणे (Communists Party) केडर बेस पार्टी आहे. भाजप व कम्युनिस्ट पक्षाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्‍या संघटना आहेत. त्यांची विचारधारा ते समाजात रुजवण्याचा प्रयत्न करीत असतात. या विचारधारेची साथ दिल्याने आपले नुकसान होणार आहे, माहिती असताना समाजातील अनेक दलित व मागासवर्ग त्यांना साथ देण्यास तयार आहे. अशांना त्याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न पार्टी करणार आहे.

 

 

राज्य सचिव ताज सिद्दीकी (State Secretary Taj Siddiqui) यांनी सांगितले की, कोंढव्यातील लोक बहुसंख्येने  सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पार्टी मध्ये सामाजिक कार्यकरण्याची इच्छा व्यक्त करत होते, म्हणून कोंढव्यात SDPI मुख्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत SDPI चे उमेदवार निवडणूक लढणार आहे.

 

यावेळी राष्ट्रीय कमिटीचे सदस्य अझर तांबोळी, समिना मेनन, मोईउद्दीन सय्यद, राज्य सचिव ताज सिद्दीकी,
जिल्हाध्यक्ष अस्लम सय्यद, उपाध्यक्ष दिलावर सय्यद, सरचिटणीस उमर सय्यद,
सलीम शेख, सचिव राज फैय्याज, जिल्हा सदस्य किरण शेख, अल्ताफ मेनर,
मेहबुब मुजावर, मुहीब शेख, जाहिद शेख, नाविद शेख, सिकंदर पठाण, माजी नगरसेवक गफूर पठाण,
मझर मणियार, प्रोफेसर झहीर पठाण, सलीम मुल्ला आदी उपस्थित होते.

 

 

Web Title :- Pune News | Inauguration of Kondhwa branch of Social Democratic Party of India

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा