home page top 1

८ जून पासून गायीचे दूध ‘एवढ्या’ रुपयांनी वाढणार !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – गायीच्या दुधाच्या दरात दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात आज पुण्यात खाजगी दूध उत्पादकांनी आपल्या बैठकीत हा दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. याआधी अमूल आणि मदर डेअरी यांनी देखील आपल्या दुधात देखील लिटरमागे दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

हे नवीन दर येत्या ८ जूनपासून लागू होणार आहेत. सध्‍या दुधाच्‍या उत्‍पादनात होत असलेली घट, शेतकऱ्यांमध्ये पशुपालनाच्‍या असलेल्‍या अडचणी, पशुखाद्‍य, वीज यांचे वाढलेले दर या सर्वाचा विचार करून दूध खरेदी दरात वाढ करण्‍याचा निर्णय खाजगी दूध उत्पादकांनी घेतला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांबरोबरच शेतकऱ्यांना देखील या सगळ्याचा फायदा होणार आहे. यापूर्वीच गोकुळने देखील आपल्या खरेदी दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, या निर्णयामुळे आता गायीचे दूध ४२ रुपये प्रतिलिटरवरून ४४ रुपये प्रतिलिटर झाला आहे.

Loading...
You might also like