Pune News | पुण्यातील 4 धरणाच्या पाणीसाठयात तब्बल दीड टीएमसीची वाढ

पुणे / खडकवासला (pune news) : पोलीसनामा ऑनलाइन – खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळी क्षेत्रात गुरुवार आणि शुक्रवारी या दोनच दिवशी जोरदार पाऊस झाला होता. मागील वीस दिवस पाऊस पडल्याने 4 ही धरणात मिळून दीड टीएमसीने (TMC) जादा वाढ झाली आहे. मात्र, शनिवारपासून पावसाची गती कमी होत गेलीय. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील (Irrigation Officer Vijay Patil) यांनी दिली आहे.

सोमवारी (21 जून) रोजी संध्याकाळी 5 वाजता या चारही धरणात मिळून 7.94 टीएमसी (TMC) अर्थात 27.25 टक्के पाणीसाठा झाला आहे. बुधवारी.(16 जून) रोजी सकाळी 6 वाजता चारही धरणात 6.62 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. म्हणजे आज अखेर 1.320 टीएमसीने (TMC) पाणीसाठा वाढला आहे. तसेच, गेल्या बुधवार पासून पुणे शहर आणि परिसरातील पाणी योजनेसाठी सोडले ते एकूण सुमारे दीड टीएमसीची (TMC) वाढ झालेली दिसून येत असल्याचे पाटबंधारे अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले आहे.

मागील आठवडी टेमघरला 110 मिलीमीटर पाऊस झाला होता. तर वरसगावला 51 मिलिमिटर, पानशेत 56 मिलिमिटर तर खडकवासला येथे 45 मिलिमिटर पाऊस झाला होता. यानंतर शनिवार, रविवार पाऊस कमी होत गेला. सोमवारी सकाळी ऊन, दुपारी ढगाळ वातावरण होते. अशीच परिस्थिती आज मंगळवारी (22 जून) रोजी पण असणार आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजता २४ तासामध्ये पडलेला पावसाची आकडेवारी बघितली असता पाऊस थांबल्याचे दिसत आहे. खडकवासला येथे 0, पानशेत 1, वरसगाव 2 आणि टेमघर 20 मिलिमीटर पाऊस झाला आहे. अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील (Irrigation Officer Vijay Patil) दिलीय.

धरणाचे नाव टीएमसी (TMC) आणि टक्केवारी –

खडकवासला : 1.20/60.86

पानशेत : 3.74/.35.18

वरसगाव : 2.49/19.45

टेमघर : 0.50/13.53

एकूण पाणी 7.94 TMC म्हणजेच 27.25 टक्के आहे.

हे देखील वाचा

माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पत्नीचे गंभीर आरोप !

Reserve Bank of India । नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 3 सहकारी बँकांवर RBI ची कारवाई; बारामती अन् इंदापूरच्या बँकेचा समावेश

WhatsApp ची ही आहेत टॉप सीक्रेट फिचर्स, जी बदलून टाकतील तुमच्या चॅटिंगचा अनुभव; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pune news | increase of one and half tmc for water in four dams of pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update