Pune News | राज्यातील नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यासाठी आजपासून बेमुदत संप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | राज्याचे नोंदणी व मुद्रांक विभाग (Registration and Stamp Department) राजपत्रित अधिकारी व कर्मचारी यांनी 3 ते 4 वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्याच्या पूर्ततेसाठी आजपासून (दिनांक 21 /9 /2021) बेमुदत संप चालू केला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गजानन खोत (Gajanan Khot) व सचिव सागर पवार (Sagar Pawar) यांनी काढलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील मागील पाच ते सहा वर्षांपासून रखडलेल्या
पदोन्नत्या त्वरित करणे, पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणे.
विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे, कोवीड-19 मुळे मयत झालेल्या विभागातील अधिकारी,
कर्मचारी (Pune News) यांचे कुटुंबीयांना तत्काळ पन्नास लाखाची मदत देणे व कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर विभागात नोकरीत सामावून घेणे.
मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांची पदे विभागातील पदोन्नतीने भरणे.
स्वीय प्रपंची लेख्यातील रक्कम विभागातील कर्मचाऱ्यांच्या व जनतेच्या सुविधेकरिता वापरणे.
तुकडेबंदी तसेच रेरा कायद्यान्वये नोंदणी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेवर करण्यात
आलेली कार्यवाही मागे घेणे, हार्डवेअर साहित्य उच्च दर्जाचे पुरविणे, आय सरिता,
इ फेरफार तसेच इतर सर्व्हरच्या अडचणी तत्काळ दूर करणे.

 

आयकर विभागाकडील विवरण पत्र, पोलीस विभाग व इतर विभागाकडून मागणी करण्यांत आलेल्याना माहिती केंद्रीय सर्व्हरवरून पुरविणे, नोंदणी अधिकारी यांचेविरुद्ध विनाकारण दाखल होणारे गुन्हे मागे घेणे,
निनावी व त्रयस्थ व्यक्ती द्वारे होणाऱ्या तक्रारीचे आधारे कार्यवाही प्रस्तावित न करणे.
सह दुय्यम निबंधक वर्ग – 2 व दुय्यम निबंधक श्रेणी-1 संवर्गाचे एकत्रीकरण करणे.
पदनामामध्ये बदल करणे. विभागीय पदोन्नती समितीमध्ये संघटनेचा एक प्रतिनिधी घेणे.
खात्याचे विभागीय परीक्षा प्रत्येक वर्षी घेणे, विभागीय चौकशीचे कारवाही विहित मुदतीत पार पाडणे.
सर्व संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल दरवर्षी विहित मुदतीत प्राप्त करणे घेऊन अद्यावत ठेवणे, शासन निर्णयानुसार पदोन्नतीची कार्यवाही करताना त्या वर्षी रिक्त असलेली पदे त्यांचा वर्षी भरणे, बदल्या करताना संघटनेस विचारात घेणे.
आदी मागण्या संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये केलेल्या आहेत.

 

Web Title : Pune News | Indefinite strike from today for various demands of the employees of the registration department in the state

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Raosaheb Danve | मुंबईत लोकल ट्रेन सर्वांसाठी कधी सुरू होणार?, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले…

Vidyadhar Karmarkar | ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’.. विद्याधर करमरकर यांचे निधन

MVA vs BJP | ‘भाजप-मविआ’मध्ये आरोपांचे राजकीय शीतयुद्ध; फडणवीस सरकारमधील कथित गैरव्यवहार ‘महाविकास’ सरकार बाहेर काढणार?