Pune News : कुख्यात गजानन मारणे आणि त्याच्या 8 साथीदारांची जामीनावर मुक्तता, कंधारेनं पोलिस मिशी काढण्यासाठी दबाव टाकत असल्याची तक्रार; जाणून घ्या न्यायालयात नेमकं काय झालं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कारागृहातून बाहेर येताना रॉयल एन्ट्री मारणाऱ्या कुख्यात गुंड गजा उर्फ गजनान मारणे व त्याच्या 8 साथीदारांना अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तळोजा कारागृह ते पुणे मुंबई महामार्ग अशी रॅली त्याच्या चाहत्यांनी काढली होती. यादरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस त्याला घेऊन जाण्यासाठी न्यायालयात फोजफाटा घेऊन आले होते. पण न्यायालयाने त्यांना घेऊन जाण्यास देखील नकार दिला आहे.

 

गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय 48), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय 36), बापु श्रीमंत बागल (वय 34), आनंता ज्ञानोबा कदम (वय 37), गणेश नामदेव हुंडारे (39), रुपेश कृष्णराव मारणे (वय 38), सुनील नामदेव बनसोडे (वय 40) श्रीकांत संभाजी पवार (वय 34) आणि सचिन आप्पा ताकवले (वय 32) अशी जामीन झालेल्याची नावे आहेत. तर याप्रकरणी अमित कदम, अभिजित विभूते, सोनू गोडांबे, विकी कटारे, राज गायकवाड, सचिन कांबळे, पप्पू घोलप, राहुल दळवी, संतोष शेलार, संदीप पिसाळ, अमित कुलकर्णी, निखिल साळुंखे, सागर पासलकर, अमोल तापकीर, अमृत मारणे, शेखर आडकर, श्याम जगताप, महेश (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात भादवि कलम 267, 268, 270, 143, 149 सह डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक संतोष पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, 500 गाड्यांच्या ताफ्यात मिरवणूक काढली, इतक्या मोठ्या प्रमाणात वाहने आणण्याची काय गरज होती, यामागे काही वेगळं कट होता का हे जाणून घेण्यासाठी  त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी वकिलांनी केली. याला आरोपीतर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडत विरोध केला. न्यायालयाने तो मान्य करत त्यांची 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

गजनान मारणे यांच्या विरोधात चुकीचे कलमे लावली होती. अटकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले गेले नाही, असे ऍड, विजय ठोंबरे यांनी न्यायालयात म्हणणे मांडले.

या दरम्यान, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात गजनान मारणे याला घेऊन जाण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची व्हॅन शिवाजीनगर न्यायालयात आली होती. पण, ठोंबरे यांनी प्रोड्युस वॉरंटला न्यायालयात विरोध केला. न्यायालयाने त्याला हजर करण्याचा आदेश फेटाळला.

आमच्या ‘मिशा’ काढण्यासाठी पोलिसांचा दबाव

गजनान मारणे व त्याच्या साथीदारांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना कोणाला काही विचारयाचे आहे का, असे विचारल्यानंतर प्रदीप कंधारे याने पोलीसांनी आमच्या मिशा आणि टक्कल करण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकला, अशी तक्रार केली आहे.

प्रकरण नेमकं काय…

कुख्यात गुंड गजानन मारणे याची पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. सोमवारी (दि. १५) सायंकाळी त्याला नवी मुंबई येथील तळोजा कारागृहातून सोडण्यात आले. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी व साथीदारांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यापर्यंत शेकडो गाड्यातून त्याची मिरवणूक काढली होती. या रॉयल इन्ट्रीने शहरात व जिल्ह्यात खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांना जाग आली आणि यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

पोलिसांच्या तक्रारीत म्हंटले आहे…

हमराज चौकात सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या हेतूने त्याने बेकायदेशीर जमाव जमविला. Covid-19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचा भंग केला आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा फायदा घेऊन समर्थकांना जमवून गणपतीची आरती करण्यासाठी जमाबंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.