Pune News | शेरेबाजी करण्यापेक्षा पाटील यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत – माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  (Policenama online) – Pune News | अन्य पक्षाच्या नेत्यांबद्दल उथळपणे शेरेबाजी करण्यापेक्षा चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पुण्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी दिला आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांच्याविषयी विनाकारण शेरेबाजी केली. त्याचा समाचार घेताना मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी पत्रकात म्हटले आहे की, पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. पण, गेली साडेचार वर्षे शहरातील मोठे प्रकल्प मात्र रखडले आहेत. भाजप ते मार्गी लावू शकलेले नाही. मुठा नदी सुधारणेसाठी ८०० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा सहा वर्षांपूर्वी प्रकाश जावडेकर (prakash javadekar) यांनी केली होती.

जावडेकर यांचे मंत्रिपद गेले पण, योजना अद्याप मार्गी लागली नाही. जावडेकर फक्त घोषणा करुन थांबले. स्मार्ट सिटी योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुण्यातच केली. पाच वर्षात योजनेचा पहिला टप्पाही भाजपला पूर्ण करता आला नाही. उलट, योजना गुंडाळण्याच्या तयारीतच मोदी सरकार आहे. समान पाणीपुरवठा योजनेच्या घोषणा झाल्या, त्या योजनेबाबतही वेळकाढूपणा चालला आहे. पुणे मेट्रोकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या योजनेचे काम लांबले. शहर विकासाकडे भाजपचे एवढे दुर्लक्ष झाले असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मात्र शेरेबाजीत रमले आहेत, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

सीरम इन्स्टिट्यूटने (serum institute of india) पुण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीचे जादा डोस देण्याची तयारी दाखविली होती.
त्याला केंद्र सरकारची परवानगी आवश्यक होती.
त्याबाबतही दोन महिने उलटून गेले तरी खासदार गिरीश बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ ती परवानगी मिळवू शकले नाहीत.
पुणेकरांनी भाजपला शंभर नगरसेवक, सहा आमदार, सलग दोन वेळा खासदारकी एवढे भरभरून दिले,
त्या बदल्यात भाजपने पुणेकरांना काय दिले ? याचा शोध आणि त्यातून काही बोध चंद्रकांत पाटील यांनी घ्यावा,
असेही माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title :- Pune News | Instead of slandering, Chandrakant Patil should sort out the stalled projects – former MLA Mohan Joshi

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

India Coronavirus Cases | देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 41 हजार नवे रूग्ण; आतापर्यंत 37 कोटी 60 लाख लोकांना देण्यात आली व्हॅक्सीन

कोरोनाच्या संसर्गात वाढ ! जागतिक आरोग्य संघटनेने दिले तिसऱ्या लाटेचे संकेत