Pune News : पुण्यातील NCL मध्ये PhD करणार्‍या 30 वर्षीय ‘पंडित’चा तृतीयपथ्यानं खून केल्याचं उघड, डेटिंग साईटवरून जुळलं होतं दोघांचं; जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एनसीएल प्रयोगशाळेत PhD करणाऱ्या ‘त्या’ तरुणाचा खूनाचे रहस्य उलघडले असून प्रेमप्रकरणातून तृतीयपथ्यानं त्याचा जीव घेतल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. त्या तरुणाचा गळा चिरून आणि चेहरा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. तर त्याचा मृतदेह सुस खिंडीत टाकला होता.

याप्रकरणी रविराज क्षीरसागर (वय 35) या तृतीयपंथ्याला पोलीसानी ताब्यात घेतले आहे. सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडीत (वय ३०, रा. शिवनगर, सुतारवाडी, मूळ रा. जानेपळ, ता. जाफराबाद, जि. जालना) या तरुणाचा खून झाला आहे. याबाबत पंडीत यांचा चुलत भाऊ संदीप (वय ३४) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन हा मूळचा जालना जिल्ह्यातील होता. तो राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) येथे रसायनशास्त्र विषयात पीएचडी करत होता. दीड वर्षांपूर्वी पुण्यात आला होता. सुतारवाडी भागात पेईंग गेस्ट म्हणून राहत होता.

दरम्यान, डेटिंगसाईडवर सुदर्शन आणि रविराज यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले होते. काही कारणावरून त्यांच्यात वाद झाले होते. यानंतर काल ते दोघे सुस खिंडीत गेल्यानंतर तृतीयपंथी रविराजने आधी सुदर्शन याचा गळा चिरला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या चेहरा दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला होता.

शनिवारी सकाळी सूस खिंडीत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांना मृतदेह दिसून आला होता. त्यांनी ही माहिती पोलिसांना दित्यानंतर चतुःश्रृंगी व गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला होता. खिशात पाकिट सापडल्याने त्या कागदपत्रांमधून त्याची  ओळख पोलिसांनी पटवली होती. पण खुनाचे कारण अस्पष्ट होते. त्यामुळे पोलीस कसून याप्रकरणाचा तपास करत होते. चतुःश्रृंगी पोलिसांना रविराज याच्या बाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला पकडण्यात आले. त्यात त्याने खुनाची कबुली दिली आहे.

ही कारवाई परिमंडळ पाचचे उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शेवाळे, पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन जाधव, प्रकाश आव्हाड, सुधीर माने, ज्ञानेश्वर मुळे, संतोष जाधव, आशिष निमसे यांच्या पथकाने केली आहे.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न
रविराज याने खून केल्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने गळ्यावर वार करत झोपेच्या गोळ्या खाल्या होत्या. पण कुटुंबातील व्यक्तींना त्याने आपण पत्नीला सांभाळू शकत नाही. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. तर डॉक्टराना देखील त्याने हीच माहिती दिली होती. पोलिस त्याचा शोध घेत गेल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांना कुटुंबाकडून समजले. मग पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला, त्याने केलेल्या खुनाची माहिती दिली. मग
हा सर्व प्रकार समोर आला. आता त्याने या खुनानंतर नेमकी आत्महत्या का केली, हे समजू शकलेले नाही.