Pune News | ‘समर्पित सेवाव्रतींचा सन्मान करणे हे आपले कर्तव्यच’; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – “कोरोनाचे Corona संकट संपूर्ण जगावर होते, पण भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशामध्ये स्वयंस्फूर्तीने इतक्या मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य घडले नाही. देशभरातील विविध संघटनांनी आणि व्यक्तींनी समाजाची गरज ओळखत वेगवेगळ्या प्रकारे मदतीचा हात पुढे केला. या सगळ्यांचे ऋण व्यक्त करण्याची गरज आहे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हे आपले कर्तव्य आहे,” असे मत भारतीय जनता पार्टीचे Bharatiya Janata Party (भाजपा) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील Chandrakantdada Patil यांनी आज (शुक्रवार) व्यक्त केले. कोरोनाच्या काळात बहुमोल योगदान देणार्‍या सेवाव्रतींवर पुणे भाजपातर्फे तयार करण्यात आलेल्या तीन ध्वनिचित्रफितींचे अनावरण पाटील यांच्या हस्ते झाले. Pune News It is our duty to honor dedicated servicemen Coronary warriors felicitated by Chandrakantdada Patil

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक Jagdish Mulik, सरचिटणीस राजेश पांडे,
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने Hemant Rasne, सभागृह नेते गणेश बिडकर,
आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार योगेश टिळेकर,
महाराष्ट्र प्रदेश चिटणीस धीरज घाटे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, “कोणतेही संकट आले, तरीही आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू,
हे पुणेकरांनी कोरोनाच्या काळात दाखवून दिले आहे.
या काळात स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी मदतीचे हात पुढे आले.
याची किंमत पैशांमध्ये कुणी करू शकत नाही. समाजाबद्दल प्रेमाची, आपुलकीची भावना असणे गरजेचे असते.”

या वेळी अभिमानपत्र, शाल, श्रीफळ व भेटवस्तू Gifts देऊन प्रातिनिधिक सेवाव्रतींचा सन्मान करण्यात आला.
‘अभिमान पुण्याचा’ या मोहिमेद्वारे संकटाच्या काळात धावून जाणार्‍या पुणेकरांची कथा समाजासमोर मांडली जाणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कर्वेनगर येथील कोविड सेंटरमध्ये अहोरात्र सेवा करणारा ओंकार अग्निहोत्री,
दृष्टिदोष पत्करूनही अविरत मोफत सॅनिटायझेशनचे काम करणारे किरण सावंत व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करणार्‍या ‘स्व-रूप वर्धिनी’, ‘सेवा सहयोग’ आणि ‘सुराज्य प्रकल्पा’ Surajya Project, च्या स्वयंसेविका यांच्यावर आधारित ध्वनिचित्रफितींचे अनावरण करण्यात आले.
या तीनही ध्वनिचित्रफितींचे लेखन वरुण नार्वेकर आणि निखिल खैरे यांनी केले असून,
दिग्दर्शन वरुण नार्वेकर Directed Varun Narvekar यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश बिडकर यांनी, तर सूत्रसंचालन राजेश पांडे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन संदीप खर्डेकर यांनी केले.
कोरोना संसर्गाच्या दोन लाटा परतवून लावताना कोरोनायोद्ध्यांसह सर्वसामान्य पुणेकरांनीही साथ दिली.
त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या विशेष अभिमान गीताचे अनावरण माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या हस्ते यापूर्वी करण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी कोरोनाच्या काळात समाजकार्य केलेल्या सेवाव्रतींचा सन्मान करण्यात आला.

Web Titel : Pune News It is our duty to honor dedicated servicemen Coronary warriors felicitated by Chandrakantdada Patil