Pune News : ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ महाराष्ट्र द्वारे अंधारातून प्रकाशाकडे राज्यव्यापी अभियानाचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  जमात-ए इस्लामी हिंद ही एक सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत संस्था आहे. इस्लाम धर्माबद्दलचे समज, गैरसमज, सामाजिक सौहार्द आणि शांततेचा संदेश देण्यासाठी ही संस्था मागील ७३ वर्षांपासून संघर्ष करीत आहे. या संस्थेतर्फे राज्यभरात २२ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान ‘काळोखापासून उजेडाकडे’ अर्थात ‘फ्रॉम द डार्कनेस टू लाईट’ हे अनोखे राज्यव्यापी अभियान महाराष्ट्र भर राबविण्यात येत आहे.अशी माहिती जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र अभियाना चे संयोजक कमेटी उपसचिव इम्तियाज शेख व पुणे शहर अध्यक्ष अजहर अली यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थे चे डॉ. आयेशा खान, मंसूर खान आदी उपस्थित होते.
या अभियाना अंतर्गत भ्रष्टाचार, दहशतवाद, अल्कहोलिजम आदींबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

या अभियानाचे सहसंयोजक इम्तियाज शेख पुणे यांनी याप्रसंगी सांगितले की, “आम्ही सामाजिक आणि राजकीय नेते आणि कार्यकत्यांच्या उपस्थितीत पुणे आणि अन्य जिल्ह्यात सुदधा राबविण्यात येईल. हा संदेश पोहोचविण्यासाठी हँडबिल, फोल्डर, व्हिडीओ क्लिप इत्यादींचा उपयोग करण्यात येईल. शिवाय, मस्जिद परिचय आणि कुरआन प्रवचनाचेही आयोजन केले जाईल. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील कुरआनाच्या प्रती लोकांमध्ये मोफत वितरित करण्याचाही मानस आहे. विशेष करून इस्लाम संबंधी ज्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर त्यांचे सयुक्तिक उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. हे सर्व काम शांततामय वातावरणात केले जाईल.”

याप्रसंगी बोलताना डॉ. आयेशा म्हणाल्या कि, “काही लोक आपल्या देशातील सौहार्दपूर्ण महान संस्कृतीला प्रदुषित करण्यासाठी अज्ञानता आणि जातीयवादाचा अंधार पसरवत आहेत. जमाअत ए इस्लामी हिंदचा प्रकाशाचा हा संदेश निश्चितरूपाने या वातावरणात उपयोगी होईल.”

अध्यक्ष अजहर अली यांनी म्हटले की, “जमाअत ए इस्लामी हिंद आपल्या राज्यव्यापी अभियानाच्या माध्यमातून प्रेषितांचे मौलिक संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत आपल्या सर्वांना शक्य होईल तेवढे यासंबंधी अध्ययन, विश्लेषण आणि स्वीकार करायला हवे.”

हे संस्थेचे चौथे राज्यव्यापी अभियान आहे. संस्थेचे राज्यभर 2 लाख कार्यकर्ते आहेत. या अभियाना अंतर्गत महाराष्ट्र भर कोपरा सभा घेण्यात येनार आहे. पुण्यात 24 जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे. अभियान द्वारे 6 कोटी लोकांशी संपर्क केला जानार आहे. हा कार्यक्रम सर्वांन पहाण्यासाठी फेसबुक लाईव करण्यात येणार आहे. असे ही इम्तियाज खान यांनी यावेळी सांगितले.