Pune News | जनजन दिवाळी ! दिवाळी जनसामान्यांची काँग्रेस पक्षाच्या उपक्रमास प्रारंभ – माजी आमदार मोहन जोशी

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | कोरोना साथीमुळे गेल्या वर्षी दिवाळी होऊ शकली नव्हती. या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी सेवाभावी वृत्तीने साजरी करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे, असे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी ‘जनजन दिवाळी ‘ कार्यक्रमात बोलताना (Pune News) सांगितले.

 

‘जनजन दिवाळी, साथ काँग्रेसची, दिवाळी जनसामान्यांची’ या उपक्रमाचा प्रारंभ फुरसुंगी येथे रविवारी करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दिनकर हरपळे, राहुल चोरघडे, प्रशांत सुरसे, कामठे-सर, अण्णा कदम, सौ.पल्लवी सुरसे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सौ.सुधा हरपळे आणि संजय हरपळे यांनी केले होते.
यावेळी आदर्श शिक्षक, सफाई कामगार, पीएमपी कर्मचारी, महापालिका कर्मचारी, रिक्षा चालक यांचा सन्मान करण्यात आला.

 

आपापल्या भागातील जनसामान्यांना धान्य, उटणे, लक्ष्मी पूजनाचे साहित्य, कंदील, पणत्या याचे वाटप, अनाथ मुलांना स्वेटर किंवा कपडे, रिक्षा चालकांना सीएनजी रिफील कुपन वाटप,
सफाई कामगार महिलांना साडी, पुरुषांना कपडे वाटप, रस्त्यावरील निराधार मुलांना अभ्यंग स्नान तसेच गोडधोड पदार्थाचे वाटप करणे, सामुदायिक भाऊबीज करणे असे कार्यक्रम जनजन दिवाळी उपक्रमातून राबविले जात आहेत, अशी माहिती माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

 

कोरोना साथीच्या काळात पोलीस, आरोग्यसेवक, रुग्णवाहिका चालक, डॉक्टर्स यांनी जोखीम घेऊन कामगिरी केली याबद्दल त्यांचा सन्मान काँग्रेसच्या
वतीने दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी केला जात आहे.
शिवाय स्थानिक पातळीवर दीप महोत्सवाचेही आयोजन केले जात आहे, असे मोहन जोशी यांनी (Pune News) सांगितले.

 

Web Title : Pune News | Janjan Diwali! Diwali Mass Commencement of Congress Party – Former MLA Mohan Joshi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

WhatsApp Facebook Meta | बदलले WhatsApp चे डिझाईन, आता दिसू लागले Facebook चे नवीन नाव Meta

Pandharpur Crime | पंढरपूर हादरलं ! 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, 3 आरोपींना इंदापूरमधून अटक

Gold Price Today | सोने-चांदीचे दर घसरले, धनत्रयोदशीच्या पूर्वीच खरेदीची संधी; तात्काळ जाणून घ्या नवीन दर