Pune News | महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या महासचिवपदी जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune News | महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या (Maharashtra Gujarati Samaj Mahamandal) विद्यमान अध्यक्ष हेमराज शहा (Hemraj Shah) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर संस्थेचे वरिष्ठ सदस्य जयप्रकाश पारेख (Jaiprakash Parekh) यांची निवड करण्यात आली. तर महासचिवपदी पुण्यातील (Pune News) जयराज ग्रुपचे (jairaj group) संचालक राजेश शहा (Rajesh Shah) यांची एकमताने फेर निवड करण्यात आली.

महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक कोरोनाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील एक दिड वर्षांपासून प्रलंबित होती.
रविवारी (दि.17) सकाळी 10.30 वाजता पुण्यातील (Pune News) मार्केट यार्ड येथील हॉटेल उत्सव डिलक्स येथे पार पडली. या बैठकीत ही निवड करण्यात आली.
या बैठकीला मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, लातूर, जालना, नांदेड, धुळे, चोपडा, अकोला, नाशिक, महाड आदी ठिकाणांहून प्रतिनिधी उपस्थीत होते.

महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ गेल्या 32 वर्षांपासून कार्यरत असून, त्यात मराठी व गुजराती समाजातील नामवंत मान्यवर, कलावंत, समाजसेवक, लेखक,
डॉक्टर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.
या महामंडळामार्फत सामाजिक (Social), शैक्षणिक (educational), वैद्यकीय (medical) अशा समाजोपयोगी कार्याचे नियोजन केले जाते.
विशेष महत्वाची बाब म्हणजे ह्या संस्थेकडून मराठी (Marathi) व गुजराती समाजाने एकत्रित काम करण्यास प्रोत्साहन दिले जाते.
दोन्ही समाजातील वैचारिक देवाण घेवाण आणि मराठी व गुजराती भाषेच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रमांचे नियमित आयोजन केले जाते.
तसेच दरवर्षी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, आणि राज्य पातळीवर कलावंत, लेखक, डॉक्टर, समाजसेवक, पत्रकार इत्यादी विशेष पुरस्काराने गौरविण्यात येते.

 

राजेश शहा हे पूना ब्लाईन्ड मेन्स असोसिएशन (Poona Blind Men’s Association) व एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल (H. V. Desai Eye Hospital) या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.
ते सन 2003 पासुन सलग महाराष्ट्रातल्या सर्व व्यापारी संघटनांची शिखर संघटना असलेल्या ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) चे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कामकाज पहात आहेत. त्याचबरोबर श्री पूना गुजराती बंधू समाज या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी, जनसेवा फाउंडेशनचे खजिनदार तर श्री महावीर जैन विद्यालय (Sri Mahavir Jain Vidyalaya),
पूना हॉस्पिटल (Poona Hospital), पूना गुजराती केळवाणी मंडळ यासह अनेक संस्थावर ते वेगवेळ्या पदांवर कार्यरत आहेत व त्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य सुरु (Pune News) आहे.

 

Web Title : Pune News | Jayaraj Group Director Rajesh Shah elected as General Secretary of Maharashtra Gujarati Samaj Mahamandal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | ‘तू मोठी झाली आहे का, मला बघायचे आहे’, नराधम पित्याकडून 11 वर्षाच्या मुलीशी लज्जास्पद कृत्य

स्पोर्ट बाईकची आवड असेल तर 16 हजारात घरी आणा Yamaha FZ 25, इतका द्यावा लागेल मासिक EMI

E-Shram Portal | आतापर्यंत 4 कोटी मजूरांनी केले रजिस्ट्रेशन; महिला कामगार आघाडीवर