Pune News : ज्वेलर्सच्या दुकानात काम करणार्‍यानेच मारला 10 लाख रूपयांच्या दागिन्यांवर डल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्यानेच 10 लाख रूपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. लक्ष्मी रस्त्यावरील नीलकंठ ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी साहिब दिलबागसिंग बीर (वय ३७, रा. कल्याणीनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बीर यांचे लक्ष्मी रस्त्यावरील पत्र्या मारूती चौकात ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यांच्या ज्वेलर्समध्ये काही कामगार आहेत. आरोपी कामगार देखील त्यांच्याकडे काम करत होता. काही महिन्यांपासून तो येथे कामाला येत होता. दरम्यान १४ फेब्रुवारीला बीर यांचे लक्ष नसताना कामगाराने दुकानातील ९ लाख ६० हजारांचे १८९ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी करत आहेत.