Pune News | पुण्यातील पत्रकार राजेंद्र येवलेकर यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणे शहरातील पत्रकार राजेंद्र लक्ष्मण येवलेकर (53) यांनी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजेंद्र येवलेकर (Rajendra Yevlekar) यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, 4 भाऊ, असा परिवार (Pune News) आहे.

 

राजेंद्र येवलेकर यांचा अचानक अशाप्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. येवलेकर यांनी आपल्या पत्रकारितेची सुरूवात नाशिकमधून केली होती. यानंतर 26 वर्ष ते पुण्यात कार्यरत होते. वृत्तपत्राच्या संपादकीय विभागात त्यांनी अनेक वर्षे संपादनाचे काम केले.

 

येवलेकर यांनी विज्ञान, तंत्रज्ञान विषयावर भरपूर लेखन केले होते. राष्ट्रीय पातळीवरील वृत्तांकनही त्यांनी अनेकदा केले होते. याशिवाय त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टीट्यूटसह अन्य काही महाविद्यालयांत पत्रकारिता विषयाचे अध्यापन कार्य केले होते. येवलेकर यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजलेले (Pune News) नाही.

 

Web Title :- Pune News | Journalist Rajendra Yevlekar from Pune passed away

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा