Pune News | कोरोना नियमाचे उल्लंघन ! पुणे जि. प. माजी अध्यक्षांसह कार्यालयाच्या मालकावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने काही निर्बंध कमी करण्यात आले परंतु काही नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. लग्न समारंभासाठीही ५० लोकांचीच उपस्थितीस परवानगी आहे. असे असतानाही माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे (Zilla Parishad member Devram Lande) यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास तब्बल दीड ते दोन हजार लोकांची गर्दी झाली होती. दोन दिवसापासून सोशल मीडियावर तसेच जुन्नर तालुक्यात हा विवाह सोहळा चर्चेला विषय ठरला होता. अखेर रविवारी लांडे यांच्यासह कार्यालयाच्या मालकावर बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी गुन्हा (Pune News) दाखल केला.

पोलीस निरीक्षक विकास जाधव (Police Inspector Vikas Jadhav) यांनी दिलेली माहिती अशी की, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे (Zilla Parishad member Devram Lande) यांच्या दोन २ मुलांचा विवाहाचा कार्यक्रम शनिवारी (दि. २८) जुन्नरमधील बारव येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात पार पडला.
परंतु, या लग्नास मर्यादेपेक्षा जास्त म्हणजे जवळपास दीड ते २००० लोकांची गर्दी जमली होती.

 

इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमल्याने समजल्यानंतर पोलीस घटनासाठी पोहोचले.
तेथे दीड ते दोन हजार लोक उपस्थित होते. दरम्यान, राज्यात साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत तसेच जिल्हा अधिकारी पुणे य जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील लग्नात लोक जमा करून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी, वरपिता देवराम लांडे, वधुपिता एकनाथ कोरडे,
वधुपिता सुधीर नामदेव घिगे, बाळु सखाराम लांडे, चैतन्य मिंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या लग्न आणि साखरपुड्याच्या समारंभासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते.
त्यासाठी हेलिपॅड देखील उभारण्यात आले होते. मात्र ते उपस्थित राहिले नाहीत.

 

Web Title : Pune News | junnars former zilla parishad president charged violating corona rules

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

CBSE ने बोर्ड परीक्षा पॅटर्नमध्ये केला मोठा बदल, यावर्षी दोन टप्प्यात होईल परीक्षा

Upcoming IPOs | सप्टेंबरमध्ये येताहेत आणखी 2 कमाईच्या संधी, जाणून घ्या किती रुपयांची करावी लागेल गुंतवणूक?

Earn Money | केवळ एक एकरच्या शेतीत 6 लाख रुपयांची करा कमाई, सरकार सुद्धा करेल मदत; जाणून घ्या