Pune News | कात्रज- कोंढव्यात वस्तीनिहाय आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा बंद राहाणार; 19 जुलैपासून वेळापत्रकाची अंमलबजावणी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune News | कात्रज (Katraj) परिसरात महादेवनगर येथे पाण्याची नवीन टाकी बसविल्यानंतरही या परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. यामुळे महापालिकेच्या (pune corporation) पाणी पुरवठा विभागाने पुर्वीप्रमाणेच आठवड्यातून एकवेळ काही भागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी पुरवठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेळापत्रकाची येत्या १९ जुलैपासून अंमलबजावणी करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या (pune corporation) पाणी पुरवठा विभागाने केले आहे. Pune News | Katraj: Water supply will be cut off once a week in Kondhwa depending on the population; Implementation of schedule from 19th July

पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार वारनिहाय पाणी पुरवठा बंद राहाणारा परिसर पुढीलप्रमाणे :

सोमवार –  कात्रज गाव, सातारा रस्ता परिसर, साईनगर, गजानन महाराजनगर, शांतीनगर सोसायटी, महानंद सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, सावंत सोसायटी.

मंगळवार –  राजस सोसायटी, कमला सिटी, इंद्रप्रस्थ सोसायटी, भुषण सोसायटी, निरंजन सोसायटी, बलकवडेनगर, स्टेट बँकनगर, टिळेकरनगर, कामठे पाटीलनगर, खडीमशीन चौक, सिंहगड कॉलेज, आकृती सोसायटी, कोलते पाटील सोसायटी

बुधवार –  सुखसागर नगर भाग १, सुखसागरनगर भाग २

गुरूवार –  शिवशंभोनगर, महादेवनगर, स्वामीसमर्थनगर, विघ्नहर्तानगर, महावीरनगर, विद्यानगर, आनंदनगर, सुंदरनगर, अशरफनगर, सावकाशनगर, काकडेवस्ती, गोकुळनगर, वृंदावननगर.

शुक्रवार –  वाघजाईनगर, प्रेरणा हॉस्पीटल, भांडेआळी, गुलाबशहानगर, कोंढवा बुद्रुक, हिलव्ह्यू सोसायटी, मरळनगर, कांतीनी अपार्टमेंट, ठोसरनगर, लक्ष्मीनगर.

शनिवार –  उत्कर्ष सोसायटी, शेलारमळा, माउलीनगर, वरखडेनगर, जाधवनगर, पोलिस कॉलनी, साई इंडस्ट्रीज, राजीव गांधीनगर, चैत्रबन वसाहत, कृष्णानगर, झांबरे वस्ती, अण्णाभाउ साठेनगर, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, काकडे वस्ती.

रविवार –  भारतनगर, दत्तनगर, जोगेश्‍वरीनगर, मोरे वस्ती, निंबाळकर वस्ती, खामकर वस्ती, शिवप्लाझा सोसायटी, पिसोळी रोड, पारगेनगर, आंबेडकरनगर, पुण्याधाम आश्रमरोड, हगवणे वस्ती.

 

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pension Slip | पेंशनधारकांना मोठा दिलासा ! आता WhatsApp च्याद्वारे सुद्धा मिळू शकते पेन्शन स्लिप

PM-Kisan | पती-पत्नी दोघेही पीएम किसानचा लाभ घेऊ शकतात का? जाणून घ्या तुमच्या प्रश्नाची उत्तरे

Pune News | पुण्यातील ‘त्या’ 12 श्वानांच्या मालकांना कोर्टाचा दणका, मनेका गांधींनी उघडकीस आणला होता क्रुरतेचा प्रकार