Pune News : दहशत पसरविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणार्‍या सराईताला खडक पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दहशत पसरविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.परवेज इक्बाल पटवेकर (वय 23, रा. 280, गुरुवार पेठ, बोंबीलवाडा पुणे) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात घरफोडी व वाहन चोरी तसेच पाहिजे आरोपी व सराईत गुन्हेगारावर पोलिसांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी हद्दीत गस्त घातली जात आहे.
यावेळी खडक पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील कर्मचारी सागर केकाण व फईम सैय्यद यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार परवेज इक्बाल पटवेकर हा पिस्टल घेऊन गंज पेठेतील एका हॉटेलमध्ये बसला आहे. त्यानंतर पोलिसांनी याठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडती कमरेला लटकवलेले एक गावठी पिस्तूल आणि आणि दोन जिवंत काडतुसे सापडली.
परवेज पटवेकर हा खडक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्याविरोधात यापूर्वी खुन, खंडणी, घातक शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.सहायक निरीक्षक सुशिल बोबडे, पोलीस अमंलदार अजिज बेग, फईम सय्यद, अनिकेत बाबर, गणेश सातपुते, संदिप पाटील, सागर केकाण, अमेय रसाळ, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राहुल मोरे, रवी लोखंडे, योगेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.