Pune News : दुचाकी चोरणार्‍या सराईताला खडक पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी khadak police सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 5 दुचाकी जप्त केल्या आहेत. अभिषेक शरद पवार (वय ३३, रा. ७१८, गुरूवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पवार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर विश्रामबाग, खडक, दत्तवाडी, लष्कर, वाकड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. खडक परिसरातून दुचाकी चोरली होती. या गुन्ह्याचा तपास खडक पोलिस khadak police करत होते.

यावेळी पवार घोरपडे पेठेतील एका गॅरेजजवळ थांबला असून तो वापरत असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार त्याला सापळा लावून पकडले.

चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली.

राज्यात Lockdown की Unlock ! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

सखोल तपास केला असता त्याने पाच दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे.

त्याने दुचाकी चोरून त्या स्वारगेट परिसरातील कालव्यालगत दुचाकी लावल्या होत्या.

‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्‍यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या

त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या

पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट,

गुन्हे शाखेतील निरीक्षक हर्षवर्धन गाडे, उपनिरीक्षक राहुल खंडाळे, विक्रम मिसाळ,

संदीप पाटील, बंटी कांबळे, राहुल मोरे, सागर केकाण, अमेय रसाळ यांनी ही कारवाई केली.

 

फडणवीसांनी मांडला विकासाचा अजेंडा, म्हणाले – ‘आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचं नाही’

 
राज्य पोलिस दल हादरलं ! पोलीस निरीक्षकाकडून महिला पोलीस शिपायावर बलात्कार, प्रचंड खळबळ

वाशिम : वाशिम मधील महिला पोलीस शिपायावर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी नांदेडच्या पोलीस निरीक्षकावर (Nanded Police Inspector) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch Washim) वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार करुन मारहाण केल्याचा आरोप पोलीस निरीक्षकावर करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल झाल्याने वाशिम पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्याचे (Ardhapur Police Station) पोलीस निरीक्षक विश्वकांत गुट्टे (Police Inspector Vishwakant Gutte) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.