Pune News : दुचाकी चोरणाऱ्या एकाला खडक पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरातील मध्यवर्ती भागातून दुचाकी चोरणाऱ्या एकाला खडक पोलिसांनी येरवड्यातून अटक केली आहे. त्याच्याकडून दुचाकी जप्त केली आहे. गणेश शंकर कानडे (वय ३१, रा. ताडीवाला रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

शुक्रवार पेठेतील सुभाषनगरमधील घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी खडक पोलिसांकडून तपास सुरू असताना, दुचाकी चोरटा येरवडा परिसरात असल्याची माहिती पोलीस शिपाई हिंमत होळकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गणेश कानडे याला अटक केले. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, सहायक निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या पथकाने केली आहे.