Pune News | बंदुकीच्या धाकाने अपहरण करुन पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न

पुणे (Pune News) : इंदापूर तालुक्यातील जंक्शन फॉरेस्ट परिसरातून एकाचे बंदुकीच्या धाकाने अपहरण (Kidnapped) करुन त्यानंतर त्याचा अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी नवनाथ हनुमंत राऊत आणि सोमनाथ भीमराव जळक यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिवराज कांतीलाल हेगडे (वय २७, रा. निमगाव केतकी, ता़ इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. महिलेला पळवून नेल्याच्या घटनेतून हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहेत.

हेगडे हे रविवारी सकाळी ६ वाजता घरी असताना दोघांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखवून कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण केले. त्यांना जंक्शन फॉरेस्ट येथे आणले.

तेथे त्यांच्या अंगावर आरोपींनी पेट्रोल टाकून आम्ही तुला खल्लास करतो, असे म्हणून पेटवून दिले व ते निघून गेले. या घटनेत शिवराज हेगडे भाजले असून इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

 

Nationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका

Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

Covid Symptoms | ‘या’ आयुर्वेदिक औषधाने 7 दिवसात ठिक होऊ शकतात कोरोनाची लक्षणे, संशोधनात आढळला पुरावा

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | Kidnapped at gunpoint and tried to burn alive by throwing petrol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update