Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे. त्याचा खून केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे सुभेदाराला पोलिसांनी अटक देखील केली आहे. पण, अपहरण झालेला चालकाचा मृतदेहच सापडत नसल्याने पोलिसांच्या तपासला गती मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. कारण, अपहरण नाट्य दीड महिन्यापूर्वी घडले असून अद्यापही अपहरण झालेल्याचा पत्ता लागलेला नाही.

शिवशंकर नरसिंग पाटोळे (वय 33) असे अपहरण झालेल्याचे नाव आहे. तर या प्रकरणी महादेव वाबळे (वय 60) याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात IPC कलम 364 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजिवनी पाटोळे (वय 24) यांनी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती बिबवेवाडी परिसरात राहण्यास आहेत. शिवशंकर हे कार चालक. दरम्यान, आरोपी वाबळे हा सुभेदार म्हणून लष्करातून निवृत्त झाला आहे.

जानेवारी महिन्यात फिर्यादी यांचे पती शिवशंकर बेपत्ता झाले. त्यांनी शोध घेतला. पण ते मिळाले नाहीत. मग त्यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी देखील प्रथम मिसिंग दाखल केली व त्याचा तपास सुरू केला. त्यानंतरही ते मिळले नाहीत. मग शिवशंकर यांचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केला, असल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मग 19 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला. तसेच तपासाला सुरुवात केली. त्यात पालिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही तपासले. त्यात एका ठिकाणी शिवशंकर व आरोपी महादेव वाबळे हे गाडीत जात असताना दिसून आले. त्यानुसार त्यांच्याकडे चौकशी केली. पण त्याने माझी भेटच झाली नसल्याचे पहिल्या चौकशीत सांगितले. यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आणि तपासाला सुरुवात केली. त्यावेळी त्याने मला गावी जायचे होते, मी गाडी घेऊन जात होते. त्यावेळी तो देखील गावी जायचे म्हणून आला. मग आम्ही गावाला निघालो. कारण, त्याचे गाव माझ्या रस्त्यावर होते म्हणून मी त्याला सोबत घेतले. पण, इंदापूरजवळ गेल्यानंतर शिवशंकर यांच्याजवळ पिस्तुल असल्याने मी त्याला रस्त्यातच सोडले आणि निघून गेलो, असे तपासात सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपासला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दोन वेळा आरोपीची पोलीस कोठडी घेतली आहे. पण, हाती काहीच मिळत नसल्याने पोलीस देखील हैराण झाले आहेत. तर शिवशंकर याचा मृतदेह देखील कुठे मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
आता पोलिसांनी शहरात बेवारस सापडलेले मृतदेहाची तपासणी सुरू केली आहे. त्याचवेळी वाबळे व शिवशंकर गेलेल्या सोलापूर रस्त्यावर दोन मृतदेह आढळून आले आहेत. त्यांचे डीएनए तपासले जाणार आहेत. त्यानुसार या खुनाच्या उद्देशाने अपहरण झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.