Pune News | सक्सेस स्क्वेअरमध्ये कोजागरी जल्लोषात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  Pune News | कोजागर म्हणजे जागरणाचा दिवस. लक्ष्मीच्या आराधनेचा दिवस. कोथरुड येथील सक्सेस स्क्वेअर सोसायटीत (success square society kothrud) मंगळवारी रात्री कोजागरी मोठ्या जल्लोषात साजरी झाली. सोसायटीतील शंभरावर सदस्य या कार्यक्रमात सहभागी (Pune News) झाले.

 

 

शारदीय पौर्णिमा, म्हणजेच कोजागरी. या दिवशी लक्ष्मीची पूजा करून ऐश्वर्यसंपन्नतेसाठी तिला चंद्रकिरणांनी युक्त दुधाचा नैवेद्य दाखविण्यात येतो.
सूर्यकिरणांप्रमाणे चंद्रकिरणेही मानवी शरीराला उपयुक्त असतात. ती अमृतगुणांनी युक्त असतात, विविध आजारांचा नाश करण्याची शक्ती त्यात असते.
त्यामुळे कोजागरीच्या दिवशी घराच्या छतावर दूध ठेवण्याची प्रथा आहे. चंद्रकिरणांनी युक्त असे दूध नंतर प्रसाद म्हणून सर्वांना दिले जाते.
शहरातील उद्यानांमधून कोजागरी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जात असे.
परंतु सध्या कोरोनाच्या संकटामुळे सध्या सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई आहे.
त्यामुळे नागरिकांनी आपापल्या सोसायट्यांमध्येच कोजागरी साजरी करण्यावर भर दिला (Pune News) आहे.

Pune News | Kojagari in Success Square society kothrud

 

कर्वे पुतळ्याजवळील सक्सेस स्क्वेअर या नव्या सोसायटीतील टेरेसवर मंगळवारी रात्री अबाल वृद्धांच्या गप्पांचे फड रंगले.
हास्य- विनोद करीत चाललेल्या या गप्पांमध्ये महिला वर्गही उत्साहाने सहभागी झाला होता.
या कार्यक्रमाची सारी सूत्रेच महिला मंडळाच्या हाती असल्याने खाण्यापिण्याची चंगळ होती.
मंगल खरात, मुग्धा कुलकर्णी व मेधा काजळे यांनी गरमागरम वडा पाव व मसालायुक्त दुधाचे नियोजन केले होते.
त्यांना अमल नाडकर्णी, दर्शना पाटील, अर्चना माने सहाय्य करीत होत्या.
वडा-पाव खाल्ल्यानंतर चंद्रकिरणांनी युक्त असलेल्या दुधाच्या प्रसादाचा आस्वाद सर्वांनी घेतला.
सौ. पित्रे, सौ. वैद्य यांनी स्वयंसेवक होऊन सर्वांना आग्रहाने पदार्थांचे वाटप केले.
अभिषेक काजळे यांनी जमा खर्चाच्या नोंदी ठेवल्या.
सोसियटीचे सेक्रेटरी प्रदीप काजळे आणि अध्यक्ष नागेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आनंद मेळावा पार पडला.

Pune News | Kojagari in Success Square society kothrud

 

Web Title : Pune News | Kojagari in Success Square society kothrud

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

State Bank of India | खुशखबर ! ‘या’ बँक ग्राहकांना घरबसल्या मिळणार 20 हजार रूपयांपर्यंत कॅश, जाणून घ्या काय आहे ही सर्व्हिस

7th Pay Commission | खुशखबर ! मोदी सरकारकडून सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट; DA 3% नी वाढवला

Indrani Balan Foundation | पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे 23 ऑक्टोबर पासून आयोजन