Pune News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्रीशक्तीच्या प्रेरणास्थान : शैलेंद्र बेल्हेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्त्रीशक्तीचे प्रेरणास्थान आहेत. स्त्रीशिक्षणाची ज्ञानरूपी ज्योत त्यांच्या बहुमोल योगदानाने आज प्रत्येक घरात प्रज्वलित झाली आहे, असे मत मांजरी बुद्रुक तंटामुक्ती समिती अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी व्यक्त केले.

मांजरी बु (ता. हवेली) अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्था संलग्न नेहरू युवा केंद्र संघठन पुणेच्या वतीने स्त्रीशक्ती सन्मान कार्यक्रम राबविण्यात आला.

कोरोना महामारीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून महिला डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यसेविका, पोलीस, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल स्त्रीशक्ती सन्मान देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ. दिलीप माने, डॉ.चारुदत्त आपटे, डॉ. सचिन आबने, डॉ. अमोल ससाने, डॉ. गणेश सातव, डॉ. नाना कोळपे, डॉ. अजय तावरे, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम उपस्थित होते.

बेल्हेकर म्हणाले की, नोबेल, ससून, सह्याद्री, डॉ. आबणे, योग, लोटस आदी हॉस्पिटल, हडपसर, मुंढवा पोलीस स्टेशन, वाहतुक शाखा, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, सोनाई स्कूल, पूनावाला स्कूल, इनोवेरा स्कूल, कुंजीर स्कूल, के.पी. पॅरामेडिकल, जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणी जाऊन स्त्रीशक्ती सन्मान हा कार्यक्रम घेण्यात आला. एक ते १५ मार्च दरम्यान सुमारे पाच हजार नारी शक्तींना गौरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन स्वर्णा राव, शुभांगी शिंदे, अतुल रासकर, मीनाक्षी कुमकर, स्वप्निल शिवरकर, समीर घुले, अर्चना दूंगरवाल, रेश्मा लोणारे, सुनिल बनसोडे यांनी केले होते.