Pune News | लक्ष्या बैल पडला लाखो रुपयांच्या फॉर्च्यूनर मर्सिडीजला भारी

पुणे : Pune News | लाखो रुपयांच्या फॉर्च्यूनर मर्सिडीज अशा आलिशान कारलाही शेतकऱ्याचा लक्ष्या भारी पडला आहे. आंबेगाव तालुक्यातील (Ambegaon Taluka) एका शेतकऱ्याच्या लक्ष्या या बैलाला तब्बल तीस लाख रुपयांची विक्रमी बोली लागलीय. बैलगाडा शर्यतीचे (Bullock Cart Race Maharashtra) घाट गाजवणाऱ्या लक्ष्या या बैलाची चांगलीच चर्चा आहेत. या लक्षाला पहायला गाडा शौकीन गर्दी करत आहे. वाऱ्याच्या वेगाने धावून घाट गाजवणाऱ्या चपळदार देखण्या लक्ष्याचीच सर्वत्र चर्चा आहे. कैलास गावडे (Kaillas Gavde) यांनी हा बैल खरेदी केला आहे. (Pune News)
पुणे जिल्ह्यातील अनेक बैलगाडा घाटांमध्ये विजेतेपद मिळवून नावलौकिक मिळविला आहे. या लक्ष्या बैलाची खरेदी गावडेवाडी येथील कैलास भगवंता गावडे यांनी केली आहे. आंबेगाव तालुक्यात या बैलाची किंमत विक्रमी झाल्याने ‘लक्ष्याची कमाल, बैलमालकाची ३० लाख ११ हजार १११ रुपयांची धमाल’ अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. (Pune News)
बैलगाडा हा विषय ग्रामीण भागातील गाडा-बैलमालक व हौशी शेतकरी यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.
प्रत्येक यात्रेत बैलगाडा शर्यत ही घेतली जाते. पण कित्येक दिवस या बैलगाडा शर्यतीवर शासनाची बंदी होती.
बैलगाडा शर्यतींना न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील यात्रा-जत्रा येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलगाडे धावू लागले आहेत. मात्र “लक्ष्या” ने लाखो रुपयांच्या फॉर्च्यूनर मर्सिडीजला खरेदीच्या बाबतीत मागे टाकले आहे.
सद्या अनेक ठिकाणी यात्रांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बैलगाडा घाटात भंडाऱ्याची उधळण व
धुराळा उडताना दिसत आहे. हौसेला मोल नाही या म्हणीचा प्रत्यय ”लक्ष्या” बैलखरेदीच्या निमित्ताने आल्याचे पहायाला मिळत आहे.
Web Title :- Pune News | Lakshya Bull fell heavily on a Fortuner Mercedes worth lakhs of rupees
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Symptoms Of Stress | तणाव घेतल्याने वाढतो ‘या’ 2 गंभीर आजारांचा धोका; जाणून घ्या