Pune News : शिरूर भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक आणि शिपायाने 50 हजार रुपयांची लाच मगितल्याचा प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक आणि शिपायाने जमीन मोजणी करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मगितल्याचा प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र नारायण शेळके (वय 29) व दीपक शिवराम ताजणे (वय 40) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लोकसेवकांची नावे आहेत. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र हे शिरूर येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय भूकर मापक म्हणून नोकरीस आहेत. तर दीपक हा शिपाई आहे. यातील तक्रारदार यांनी जमीनमोजणी साठी भूमि अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. तसेच, आवश्यक ती शासकीय फी देखील भरलेली होती. पण त्यानंतरही लोकसेवक रवींद्र यांनी 50 हजार रुपयांची लाच मागीतली होती. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार अर्ज केला होता. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.