Pune News | भारतातील पहिलीच घटना चक्क ‘इनक्यूबेटर’मध्ये मोरांचा जन्म

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | एका अंडी उबवण केंद्रात (Incubator) पहिल्यांदाच लांडोरीच्या अंड्यांपासून 4 मोरांच्या पिल्लांचा (4 peacock chicks) जन्म झाल्याचं समोर (Pune News) आलं आहे. अशी ही अजब घटना भारतामधील पहिली महाराष्ट्रातच घडली आहे. महाराष्ट्र वनविभाग (Maharashtra Forest Department) आणि इला फाउंडेशन (Ela Foundation) माध्यमातून चालवण्यात येणार्‍या पिंगोरी (Pingori) येथील ‘इला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर’(Ela Transit Treatment Centre (ETTC)) मध्ये ही किमया करण्यात या सेंटरला यश आलं आहे. कृत्रिम अंडी उबवण केंद्रात मोरांना जन्म देण्याची ही भारतातील पहिलीच घटना असल्याचं केंद्राने म्हटलं आहे. (Pune News)

 

इला फाउंडेशनच्या (Ela Foundation) तज्ज्ञांनी इला ट्रांझिट सेंटर येथे कृतिमरित्या उबवण पेटीमध्ये (Incubator) ही अंडी ठेवली आणि त्यातून मोरांना जन्म देण्यात यश मिळवले आहे. मोरांचे अंडी उबवण्याबाबतचे हे एक अधिकृत इन्क्युबेशन सेंटर (Incubation center) आहे. दरम्यान, अनेकदा लांडोरीची अंडी सापडल्याने सहानुभूतीच्या भावनेतून लोक अंडी वाचवतात आणि तेच उबवण्यासाठी घरच्या कोंबडीखाली ठेवतात. कोंबड्याही त्या अंडी उबवतात, मात्र, या अंड्यांचा आकार मोठा असल्याने ते योग्य रितीने उबवले जात नाहीये. त्याचबरोबर त्या अंड्यांचा आकार न जुळल्यामुळे बहुतेक वेळा लांडोरीची (Landor) अंडी उबवली न जाता ती निकामी होतात. त्यामुळे कायद्याने देखील असं करण्यास मान्यता नाहीये. (Pune News)

दरम्यान, विणीच्या हंगामात लांडोर (Landor) फार सावध असतात.
त्या शेताच्या बांधावर, माळरानावर अंडी घालतात. तसेच त्या काटेरी वनस्पतींमध्ये देखील हे अंडे लपवत असतात.
जर ते अंडे नागरिकांना सापडले अथवा त्यांना त्रास झाला तर लांडोर ते अंडी सोडून देखील देतात.
दरम्यान, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 (Wildlife Conservation Act 1972) अंतर्गत मोर पक्षाचे अंडी हाताळण्यास प्रतिबंध करण्यात आलं आहे.

 

Web Title :- Pune News | landor chicks get life incubator first incident country peacocks born in incubators Ela Foundation Pingori ETTC

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात तोतया डॉक्टर करायचा ‘हेअर ट्रान्सप्लांट’; विमाननगर परिसरातील 2 महिलांसह तिघांचा पर्दाफाश

Corporator Avinash Bagwe | पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द; कोर्टाकडून ‘त्या’साठी 6 आठवड्यांची मुदत

Devendra Fadnavis | होय ! आम्ही हिंदुत्त्ववादी, सावरकरवादी आहोत, फडणवीसांचा शिवसेनेवर टीकेचा ‘बाण’ (व्हिडिओ)