Pune News | मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी शेवटचे दहा दिवस संधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार यादी (Voter List) पुनःपरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत दुबार किंवा मृत मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. तसेच मतदार यादीत नाव नसलेल्यांना नाव नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी (Draft Electoral List) ९ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी पुणेकरांना शेवटचे दहा दिवस संधी आहे. (Pune News)

 

मतदार यादी पुनःपरिक्षण कार्यक्रमांतर्गत ७ नोव्हेंबरपर्यंत पुरवणी आणि एकत्रित प्रारुप यादी तयार करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (State Chief Electoral Officer) यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत, तर २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख (District Election Officer Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिली. (Pune News)

 

मतदार म्हणून नोंदणी कशी कराल?

मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनेवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ ही माहिती भरल्यानंतर समजेल. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा भरावा, पत्ता बदलण्यासाठी आठ-अ, तर नाव वगळणीसाठी सात क्रमांकाचा अर्ज भरावा, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

 

Web Title :- Pune News | Last 10 days to register name in voter list

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा