Pune News | पुण्याच्या हडपसरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी; साडेसतरा नळी आणि भोसले वस्ती परिसरात दहशतीचे वातावरण

पुणे : Pune News | गेले काही दिवसांपासून हडपसर (Hadapsar), फुरसुंगी परिसरात दर्शन देणार्‍या बिबट्याने (Leopard) आज (मंगळवार) पहाटे केलेल्या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला (Pune News) आहे. हडपसरमधील गोसावी वस्ती, सिरम कंपनीमागे आज पहाटे साडेपाच वाजता हा हल्ला झाला.

संभाजी बबन आटोळे (रा. गोसावी वस्ती) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डाव्या बाजूला बिबट्याने पंजा मारल्याने त्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

 

 

 

संभाजी आटोळे आणि अमोल लोंढे हे दोघे मॉर्निंग वॉकला जात होते. त्यावेळी गवतात लपून बसलेल्या बिबट्याने संभाजी आटोळे यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यात संभाजी आटोळे हे जखमी झाले. हा प्रकार समजताच परिसरातील लोकांनी तेथे एकच गर्दी केली (Pune News) आहे. हल्ला केल्यानंतर बिबट्या जवळच्या पडक्या घरात, झुडपात लपला असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

या घटनेची माहिती आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांनी वन विभागाला कळविली आहे.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आहे. वन विभागाची मदत रवाना होत आहे.
या घटनेमुळे साडेसतरा नळी, गावदेवी, गोसावी वस्ती परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा

Air India चा सौदा झाला पक्का ! DIPAM ने सांगितले – ‘18000 कोटी रुपयांच्या करारावर झाले हस्ताक्षर’

Aryan Khan Drugs Case | वानखेडेंवर आरोप करणारे प्रभाकर साईल यांच्या आई हिरावती यांचा मोठा गौप्यस्फोट; जाणून घ्या आता कोण अडचणीत येणार?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | leopard in Hadapsar of pune attack on two youth who went for morning walk

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update