Pune News | लेफ्टनंट आदित्य रमेश मचालेंच्या कर्तृत्वाची प्रेरणा आजच्या युवा पिढींनी घ्यावी – आबा बागुल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाल्याबद्दल आदित्य रमेश मचाले (Aditya Ramesh Machale) यांचा तुषार गार्डन, पिंपळे सौदागर, पुणे येथे सोसाटीतील नागरिकांनी फुल उधळून व भारतीय संस्कृती प्रमाणे सोसाटीतील महिलांच्या हस्ते ओवाळून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी पुणे मनपातील काँग्रेसचे गटनेते आबा बागुल (pmc congress group leader aba bagul) व विठ्ठल कृष्णाजी काटे (मा. विरोधी पक्ष नेते व नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगर पालिका) यांच्या हस्ते फुलांचा हार, शॉल, श्रीफळ व स्मृतिचिन्न देऊन सत्कार करण्यात आले. या प्रसंगी आई मनीषा रमेश मचाले, वडील रमेश मचाले, अहिसेख मचाले उपस्थित होते. (Pune News)

 

 

आपले मनोगत व्यक्त करताना बागुल म्हणाले, आपल्या कुटुंबातील एक सदस्य भारत मातेच्या सेवेसाठी रुजू झाला,
मातृभूमीसाठी समर्पित भावनेने सर्वस्वाचा त्याग करून पुढे जात आहे याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमानाची बाब आहे.
आदित्यची अवघ्या तेविसाव्या वर्षी मोठ्या पदावर निवड झाली ही आम्हा पुणेकरांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे.
आदित्य सारख्या तरुणाचा आदर्श इतर तरुणांनीही घेतला पाहिजे. अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली. (Pune News)

 

Web Title :- Pune News | Lieutenant Aditya Ramesh Machale’s deeds should be inspired by today’s young generation – Aba Bagul

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3459 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Solapur Crime | पोलीस निरीक्षकावर पुण्यानंतर सोलापूरमध्ये विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल

 

Pune Crime | शास्त्री रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग, भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे खळबळ

 

IPS Asim Arun Profile | 28 वर्षांच्या दमदार कारकिर्दीनंतर यूपीचे IPS असीम अरुण यांची राजकारणात एन्ट्री, जाणून घ्या कोणत्या सीटवरून लढवणार निवडणूक