Pune News : दहशत पसरविणार्‍या सराईतावर स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई करत एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. चतुःश्रुगी पोलिसांनी त्याच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई केली आहे.

गौरव संभाजी काकडे (वय २८, रा. सोमेश्वरवाडी विठ्ठल मंदिरा शेजारी, पाषाण) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्याचे नाव आहे.

काकडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो साथीदारांच्या मदतीने परिसरात दहशत पसरवत असे. त्याची गुन्हेगारी कृत्ये गेली दोन वर्षे सुरू आहेत. त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावर पसरलेले आहे. दरम्यान त्याच्यावर जरब बसावी व त्याचे गुन्हेगारी कृत्ये कमी व्हावे यासाठी चतुःश्रुगी पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएनूसार कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार हा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यानी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर आयुक्त गुप्ता यांनी त्याच्यावर कारवाई करत येरवडा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.