Pune News | ‘नाट्यगृह लवकर सुरु करा’, पुण्यात कलाकारांची महाआरती (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने (Maharashtra Government) निर्बंध शिथिल केले आहेत. परंतु असे असले तरी राज्य सरकारने राज्यातील नाट्यगृह (Theaters) आणि चित्रपटगृह (cinemas) सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे (Artists) मोठे हाल होत आहेत. राज्य सरकारचे याकडे वेधण्यासाठी आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली. राज्यातील नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्यासाठी कलाकारांनी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात (balgandharva rangmandir pune) नटराजाची महाआरती करण्यात (Nataraj maha aarti performed by artists) आली.

राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवर (vijay wadettiwar) यांनी 1 सप्टेंबरपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु त्यांची ही घोषणा हवेत विरल्याची भावना कलाकारामध्ये आहे.
सरकारला जागं करण्यासाठी जागर आणि गोंधळाचं आयोजन आज पुण्यात करण्यात आलं होतं.
यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे (Actress Priya Berde), अभिनेते गिरीश ओक (Actor Girish Oak), अभिनेत्री सुरेखा कुडची (Actress Surekha Kudchi) यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सांगितले की, सरकारला आमची बाजू कळावी म्हणून आम्ही आज या महाआरतीचं आयोजन केलं होतं. आमची मागणी सरकारने मान्य करावी.
आम्हाला आश्वासन दिलं होतं. मात्र, त्याचं पुढे काही होताना दिसत नाही.
त्यासाठी आम्हाला महाआरती करुन सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सध्या कलाकारांची स्थिती खूपच बिकट आहे. आम्ही मोर्चे काढू शकत नाही.
आम्ही हिंसाचार करु शकत नाही. आम्ही कलाकार आहोत आणि प्रेक्षकांना आम्ही मायबाप म्हणून बघतो. रंगदेवतेला साक्षी ठेवून आम्ही सरकारकडे मागणी केली आहे की, नाट्यगृह सुरु करा. आम्हा कलाकारांना न्याय द्या, अशी विनंती त्यांनी केली.

 

अभिनेता गिरीश ओक यांनी सांगितले, नाटक ही कला अशी आहे की, वर्च्युअल (Virtual) किंवा ऑनलाइन (Online) माध्यमातून होऊ शकत नाही.
प्रत्यक्ष रंगमंचावर काम करणारे जे कलाकार आहेत.
त्यांना समोर प्रेक्षक लागतात.
त्यामुळे कलाकारांची कुचंबणा होत आहे.
हा एक व्यवसाय आणि त्या व्यवसायावर बऱ्याच जाणांचं पोट अवलंबून आहे.
आम्ही तीव्र आंदोलन करु शकत नाही. बाकीच्या गोष्टी हळूहळू सुरु होत आहेत.
तसं आमचं नाट्यगृह सुरू व्हावं.

 

Web Title : Pune News | maha aarti performed by artists in pune for theater

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Virginity Test and Repairs | व्हर्जिनिटी पुन्हा मिळवण्यासाठी ही पद्धत अवलंबत आहेत तरूणी, बॅनची मागणी

Nutrition Reasons | का लागते वारंवार भूक? ‘ही’ 9 कारणे असू शकतात जबाबदार; जाणून घ्या

Sharad Pawar | ED चा ससेमिरा ! शरद पवारांनी बोलावली NCP च्या नेत्यांची तातडीची बैठक