Pune News | महाराष्ट्र पोलीस दल हे सर्वोत्तम ! गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पोलीस बिनतारी संदेश मुख्यालय परिसरातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इनोव्हेशन केंद्राचे उदघाटन

पुणे (Pune News) : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | सन १९६० पासून ते आजतागायत संप्रेषण क्षेत्रात विविध बदल झालेले आहेत. त्यानुसार राज्याचे पोलीस दल नेहमी तत्पर, कार्यक्षम, अचूक निर्णयक्षम म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे राज्याच्या पोलीस दलाप्रती देशातील पोलीस दलाला नेहमी आदर वाटतो, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (home minister dilip walse patil) यांनी काढले. ते पुण्यातील (Pune) पोलीस बिनतारी संदेश मुख्यालयातील (Police Wireless Message Headquarters) कार्यक्रमात बोलत होते.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण व परिवहन कार्यालयाच्या आयोजित विविध प्रकल्पाचे उद्घाटन करुन आढावा घेण्यात आला. त्यावेळी अपर पोलीस महासंचालक व संचालक रितेश कुमार (Additional Director General of Police Riteish Kumar) , कारागृह व सुधारसेवा अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुनील रामानंद (Additional Director General of Police Sunil Ramanand), कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई (Deputy Inspector General of Prisons Yogesh Desai) यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Pune News | Maharashtra Police Force is the best ! Home Minister Dilip Walse Patil Police Wireless Message Headquarters Dr. A.P.J. Abdul Kalam Innovation Center

 

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्य बिनतारी संदेश विभागात प्रशिक्षणार्थी क्षमतावाढी बाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना देत त्याचा पाठपुरावा करुन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पोलिस कल्याण निधीच्या माध्यमातून पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सांगितले.

गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्याहस्ते पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस बिनतारी संदेश मुख्यालय परिसरातील 6 इमारती ११२.८४KW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प,प्रतिवर्षी ३ कोटी लीटर पाणी साठा करण्याची क्षमता असलेला पर्जन्यजल पुनर्भरण (R WH) प्रकल्प, तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इनोव्हेशन केंद्राचे (Dr. A.P.J. Of Abdul Kalam Innovation Center) उदघाटन करण्यात आले.

गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी पोलीस बिनतारी संदेश संग्रहालय, सर जे.सी. बोस ई-लर्निंग केंद्राची पाहणी केली.

आयएसओ प्रमाणपत्राचे वितरण

गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते मुंबई शहर पोलीस बिनतारी संदेश विभाग व पोलीस बिनतारी संदेश मुख्यालय पुणे कार्यालयाकरीता आयएसओ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते सौर ऊर्जा प्रकल्प व पर्जन्यजल पुनर्भरण (RWH) प्रकल्प समन्वयक व प्रायोजक रश्मी पारडीवाला यांचा सन्मानचिन्ह प्रदान करुन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभारप्रदर्शन बिनतारी विभागाचे पोलीस महानिरीक्षक राजेंद्र डहाळे यांनी केले.

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे -पंढरपुर पालखी मार्गावर कुख्यात गुंड गणेश रासकरची ‘गेम’, डोक्यात गोळीबार करून केला ‘खात्मा’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune News | Maharashtra Police Force is the best ! Home Minister Dilip Walse Patil Police Wireless Message Headquarters Dr. A.P.J. Abdul Kalam Innovation Center

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update