पुण्यातील ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनयेथील – mahatma phule mandai fire | महात्मा फुले मंडईच्या आतील बाजूच्या छताला गुरुवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. अग्निशामन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होऊन ही आग आटोक्यात आणली. आग लागण्यामागील कारण समजू शकले नाही. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत मिळलेली माहिती अशी की, गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले मंडईच्या आतील भागास आग लागली. अग्निशामन दलाला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तीन गाड्या दाखल झाल्या. त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले काही वेळानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महात्मा फुले मंडई ही ब्रिटिशकालीन वास्तू आहे. या वास्तूच्या आतील बहुतांश भाग लाकडी असल्याने आग लागल्यानंतर हा भाग जळाला आहे. या आगीमागील कारण समजू शकले नाही. अशी माहिती अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हे देखील वाचा

सावधान ! ‘या’ 5 गोष्टींपासून आता तरी दूरच राहा, इम्यूनिटीला करतात कमकुवत; जाणून घ्या

11 जून राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, 5 राशींमध्ये आनंद, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

नितिन गडकरींचा भाऊ असल्याचे सांगत 5 लाखांची फसवणूक, पिता-पुत्रास अटक

Surya Grahan 2021 : सूर्य ग्रहणामुळे येत्या 45-90 दिवसात होणार उलथा-पालथ ? ज्योतिषांनी केली मोठ्या संकटाची भविष्यवाणी

कोरोनातून बरे झालेल्या लोकांना व्हॅक्सीनची आवश्यकता नाही; पीएम मोदींना हेल्थ एक्सपर्ट्स सल्ला

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pune news mahatma phule mandai fire